0corona_498.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

धक्‍कादायक! सोलापुरात शुक्रवारी सापडले चार रुग्ण; सहा जणांचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरात शुक्रवारी (ता. 26) कोरोना पॉझिटिव्ह चार नव्या रुग्णांची भर पडली. तर दुसरीकडे चिंताजनक बाब म्हणजे सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर शहरातील रुग्णसंख्या दोन हजार 84 झाली असून त्यापैकी 234 जणांचा मृत्यू झाला आहे. 


शहरातील धमश्री लाईन, मुरारजी पेठ, आदर्श नगर, एमआयडीसी रोड याठिकाणी प्रत्येकी एक तर जुनी पोलिस लाईन येथे दोघांना शुक्रवारी कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. शहरातील आतापर्यंत एक हजार 99 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर सद्यस्थितीत 751 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्ण संख्या कमी-अधिक होत असतानाच उपचार घेऊन बरे होणाऱ्यांचीही संख्या समाधानकारक आहे. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण खूपच अधिक असल्याने राज्यातील विविध मंत्र्यांनी आढावा बैठका घेतल्या. तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी स्वतंत्र समितीही नियुक्‍त केली, मात्र फारसे यश आल्याचे दिसत नाही. 
 

'या' परिसरातील सहा जणांचा मृत्यू 
बिलाल नगर, जुळे सोलापुरातील 52 वर्षीय, एनजी मिल चाळ परिसरातील 78 वर्षीय, गंगानगर, जुना देगाव नाका येथील 45 वर्षीय, गुरुवार पेठेतील 85 वर्षीय, राज पॅलेस, सत्यम चौक परिसरातील 75 वर्षीय, जुनी पोलिस लाईन येथील 48 वर्षीय व्यक्‍तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे महापालिकेच्या आरोग्याधिकाऱ्यांनी सांगितले. त्यापैकी काहींना 17 तारखेला तर काहींना 22 तारखेला दाखल करण्यात आले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT