Four robbers arrested in Rahuri 
पश्चिम महाराष्ट्र

मंत्र्यांच्या मिरवणुकीत "हात की सफाई' दाखविणाऱ्या चौघांना बेड्या

विलास कुलकर्णी

राहुरी : नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मिरवणुकीत गर्दीचा फायदा घेऊन "हात की सफाई' दाखविणाऱ्या चौघांना रविवारी (ता. पाच) सायंकाळी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. विशेष म्हणजे, हे आरोपी त्याच रात्री राहुरीतील सराफ पेढ्या व दुकाने लुटण्यासाठी आले होते. पोलिस तपासात ही बाब समोर आली आहे. 

शहरातील सराफांच्या पेढ्या व दुकाने फोडण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना रविवारी (ता. पाच) सायंकाळी सहा वाजता नगर-मनमाड रस्त्यावरील बॅलेंटाईन चर्चसमोर राहुरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. राहुरी न्यायालयाने त्यांना गुरुवारपर्यंत (ता. नऊ) पोलिस कोठडी सुनावली. गर्दीचा फायदा घेऊन त्यांचे तीन साथीदार मात्र पसार झाले.

जितेंद्र मुरलीधर काळे (वय 55, रा. नाथनगर, पाथर्डी), शकूर बादशाह शेख (वय 36, रा. पागोरी पिंपळगाव), सुनील दत्तू म्हस्के (वय 17, रा. माणिकदौंडी, ता. पाथर्डी) व अक्षय सुदाम भले (वय 20, रा. डिग्रस, ता. राहुरी), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पाथर्डी पोलिस ठाण्यात जितेंद्र काळे याच्याविरुद्ध आठ, तर शकूर शेख याच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत. 

चोरीसाठी टोळी मिरवणुकीत सामील

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नागरी सत्कारानिमित्त रविवारी (ता. पाच) दुपारी राहुरीत मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी जमलेल्या गर्दीचा फायदा घेण्यासाठी दरोडेखोरांची टोळीही मिरवणुकीत सामील झाली होती. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर जमलेल्या गर्दीत चोरांच्या टोळीने अनेकांचे खिसे कापले. तिघांच्या गळ्यांतील 10 तोळ्यांच्या सोन्याच्या साखळ्या चोरल्या. त्याचा बोभाटा झाल्यानंतर पोलिस दल सतर्क झाले. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी साध्या वेशातील पोलिसांचे पथक मिरवणुकीत पाठविले. 

सराफी पेढ्या व दुकानेच होती लक्ष्य 

पोलिसांचा सुगावा लागताच टोळीतील चोरांनी पळ काढला. त्यांतील चौघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी रविवारी रात्री सराफ बाजारातील पेढ्या व दुकाने फोडण्यासाठी आल्याचे सांगितले. त्यांचे तीन साथीदार दुचाकीवरून पसार झाले. शंकर शिवाजी पावरा (रा. इंदिरानगर, पाथर्डी) असे त्यांतील एका आरोपीचे नाव असल्याचे पोलिस चौकशीत पुढे आले. अन्य दोघांची नावे समजलेली नाहीत. त्यांच्याकडून कोयता, दोन चाकू, मिरचीपूड, असे दरोड्याचे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले. याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT