four year boy dead in saundatti for family reasons in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

मन सुन्न करणारी घटना ; काकानेच घेतला चार वर्षाच्या पुतण्याचा जीव

महेश काशीद

बेळगाव : संपत्ती वादातून चार वर्षीय बालकाची हत्या करण्यात आल्याची घटना सौंदत्ती तालुक्‍यातील हारुगोप्प गावात आज घडली. मारुती सुरेश संकण्णावर असे मृत बालकाचे नाव आहे. इराप्पा बसप्पा संकण्णावर (वय 35, हारुगोप्प) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत प्राथमिक उपलब्ध माहितीनुसार मालमत्ता वादातून हत्या झाल्याचे मानले जात आहे. भावंडात संपत्तीच्या मालकी हक्कावरून वाद आहे. 

वादातून मोठ्या भावाच्या मुलाची हत्या करण्यात आल्याचे समोर येत आहे. चार वर्षीय बालकाची निर्घृण हत्या घडल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. यावेळी मुरगोड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून ते पुढील चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार काकांनी हत्या केल्याचे आढळून आल्यानंतर त्यादिशेने चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मालमत्तेच्या वादातून खूनाची घटना घडल्याचे दिसत आहे. पंरतु, खरोखर तेच कारण आहे का? याची शहानिशा केली जात आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara Drought Relief: दुष्काळग्रस्तांसाठी मोठा दिलासा! साताऱ्यात मागणी करताच मिळणार मोफत धान्य; स्थलांतरितांनाही लाभ

Maharashtra Weather Update : एकीकडे ऑक्टोबर हिटचा तडाखा, दुसरीकडे विजांसह पाऊस लावणार हजेरी; महाराष्ट्रातील हवामानाचा नवा अंदाज जारी

Navratri Day 5: स्कन्दमाता

Wildlife Tourism: वाघांच्या पलीकडे मध्य प्रदेशाची नवी झेप; चंबळमध्ये डॉल्फिन, गांधी सागरमध्ये गिधाड सफारीची योजना

आजचे राशिभविष्य - 15 ऑक्टोबर 2026

SCROLL FOR NEXT