fraud in belgaum gokak two officers larceny from person in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

नवीन टीसी बसविण्यासाठी ६५ हजारांची लाच मागितली ; हेस्कॉमचे दोन अधिकारी जाळ्यात

सकाळ वृत्तसेवा

गोकाक (बेळगाव) : वारंवार नादुरुस्त होणारा ट्रान्स्फॉर्मर (टीसी) बदलून त्या ठिकाणी नवीन टीसी बसविण्यासाठी ६५ हजारांची लाच स्वीकारणारे हेस्कॉमचे दोघे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकले. लोळसूर (ता. मुडलगी) येथील हेस्कॉमच्या विभागीय कार्यालयात शुक्रवारी (ता.२९) एसीबीने ही कारवाई केली. लोळसूरचे सेक्‍शन ऑफिसर प्रकाश विरुपाक्षी परीट आणि अधिकारी मल्लय्या कुमारस्वामी हिरेमठ अशी त्यांची नावे आहेत.

वरील संशयिताविरोधात शुक्रवारी (ता.२९) आनंद उद्दप्पा धर्मट्टी (रा. अरभावी ता. मुडलगी) यांनी एसीबी पोलिसात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादी आनंद यांच्या वडिलांच्या मालकीची मुडलगी तालुक्‍यातील अरभावी गावात सर्व्हे नंबर ४३/१ मध्ये जमीन आहे. सदर जमिनीमध्ये असलेली टीसी वारंवार नादुरुस्त होत असल्याने ती टीसी बदलून त्याठिकाणी नवीन टीसी बसविण्याची मागणी हेस्कॉमच्या वरील अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र, टीसी बदलून देण्यासाठी दोघांनी आनंद यांच्याकडे ६५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी याबाबत एसीबी पोलिसात फिर्याद दाखल केली होती.

पोलिस अधीक्षक बी. एस. न्यामगौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक एन. वेणुगोपाल यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक एच. सुनीलकुमार, ए. एस. गुदीगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून लाच स्वीकारताना दोघांनाही रंगेहात अटक केली. संशयितांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली.

संपादन - स्नेहल कदम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Repo Rate: कर्जदारांना मोठा धक्का? ऑक्टोबर-डिसेंबरमध्ये रेपो रेट वाढण्याची शक्यता; EMI किती वाढणार?

Petrol Pump Facilities: पेट्रोल पंपांवरील ‘हवाच गुल’, भरणार कुठे?हवेचे यंत्र बंद, शौचालयांना कुलूप; वाहनधारकांना पिण्याचे पाणीही मिळेना

CM विजय यांनी नवजात बाळांना दिली सोन्याची अंगठी; भाजपने टीका करत म्हटलं, मुलांना दुधाची जास्त गरज

Thane News: ठाण्यात शिंदेंच्या कार्यकर्त्याला महिलांनी धु-धू धुतला, पोलिसांसमोर घडला प्रकार; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : पोलिसांसोबत कर्तव्य बजावणारे ९०० होमगार्ड मानधनाविना

SCROLL FOR NEXT