fraud to retired teacher salary in belgaum before 1 and half year one arrested by police in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

निवृत्ती शिक्षकांच्या वेतनात केली तब्बल दीड कोटींची अफरातफर

सकाळ वृत्तसेवा

खानापूर (बेळगाव) : येथील राष्ट्रीयीकृत बॅंकेतील निवृत्त शिक्षकांच्या वेतनात सुमारे दीड कोटींची अफरातफर केलेल्या कर्मचाऱ्याला तब्बल दीड वर्षांनंतर अटक करून त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली. मुकुंद विठ्ठल चलवादी (वय ४८, रा. चापगाव) असे त्याचे नाव आहे. दीड वर्षांपूर्वी हे प्रकरण ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर त्याची चौकशी सुरू होती.

याबाबत पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, तालुक्‍यातील अनेक शिक्षकांच्या निवृत्ती वेतनात घोटाळा करून मुकुंद याने दीड कोटींची अफरातफर केली होती. यासंदर्भात ‘सकाळ’ने त्यावेळी आवाज उठविला होता. त्याची खातेनिहाय चौकशी होऊन सदर राष्ट्रीयीकृत बॅंकेकडून पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली होती. पण, अफरातफर झाल्याचे निष्पन्न झाले नव्हते. पोलिस आणि बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी केल्यानंतर मुकुंद  यानेही गैरव्यवहार केल्याचे कबूल केल्यानंतर शनिवारी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्याची हिंडलगा कारागृहात रवानगी करण्यात आली.

तालुक्‍यातील शेकडो निवृत्त शिक्षकांचे वेतन मंजूर झाले नसल्याचा बनाव मुकुंद यांनी केला होता. त्याने ही रक्कम परस्पर स्वत:च्या खात्यावरून वेगवेगळ्या खात्यांवर वर्ग करून गैरव्यवहार केला होता. निवृत्त शिक्षकांनी यासंदर्भात ‘सकाळ’कडे तक्रार केल्यानंतर सविस्तर वृत्त प्रसिध्द करण्यात आले. त्याची दखल घेत संबंधीत बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता हा गैरव्यवहार उघडकीस आला होता. पण, पुराव्यांअभावी मुकूंद मोकाट होता. दरम्यान, आज त्याला अटक करून त्याच्यावर कायदेशिर कारवाई करण्यात आली. खानापूरचे उपनिरीक्षक बसगौडा पाटील याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vande Bharat News: पुणे रेल्वे स्थानकावर मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात कसा झाला? कारण आलं समोर, चौकशीचे आदेश

Axar Patel Reaction : मलाच काही समजत नाहीए...! RCB ने दिलेल्या धक्क्यानंतर अक्षर पटेल गोंधळला; म्हणतो, आता काय पुढे...

Pune Charity Commissioner : पारदर्शक न्यायदान हाच न्यायव्यवस्थेचा कणा : पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त दिनेश कोठलीकर यांचा कार्यभार स्वीकारताना निर्धार

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Mohol Crime : पैशाच्या वादातून एकाचा खून, एक गंभीर जखमी; आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT