पश्चिम महाराष्ट्र

स्वातंत्र्यसैनिकांना उद्या अभिवादन - रघुनाथदादा

सकाळवृत्तसेवा

इस्लामपूर - गोऱ्या इंग्रजांनी गोळ्या घातलेल्या व फाशी दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना व काळ्या इंग्रजांनी फाशी घ्यायला भाग पाडलेल्या शेतकरी, शेतमजूर, स्त्री-पुरुष शहिदांना अभिवादन मेळावा गुरुवारी (ता. २३) येथील राजारामबापू पाटील नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. देशभरातील विविध संघटनांचे नेते या मेळाव्यात मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आमदार बच्चू कडू प्रमुख पाहुणे आहेत.

पाटील म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांना कर्जातून मुक्‍त करा, केंद्र सरकारने अकुशल स्त्री-पुरुष मजुरांना जाहीर केलेले ३५० रुपये व सर्व शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्‍के नफा, असा हमीभाव मिळालाच पाहिजे, साखर बगॅस व मोलॅसिसचे वाढलेले भाव लक्षात घेता गत गळीत हंगामात उसाला प्रतिटन एक हजार रुपये जादा मिळाले पाहिजेत व दिव्यांगाना शासनाने जाहीर केलेल्या सवलती व सोयीसुविधा तातडीने द्याव्यात, या प्रमुख मागण्या घेऊन शहिदांना अभिवादन मेळावा आयोजित केला आहे. 

मोदी सरकारने शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन सत्ता मिळवली. मात्र त्यांनी आश्वासने पाळलेली नाहीत. जीवनावश्‍यक वस्तूंच्या यादीत असणाऱ्या पिकांचा उत्पादन खर्च सरकारला माहीत आहे. कृषिमूल्य आयोगानेही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.’’

ते म्हणाले, ‘‘साखर कारखानदारांनी एफआरपी दिली यावर आम्ही समाधानी नाही, त्यांनीही बढाया मारू नयेत. त्यांनी मेहेरबानी केलेली नाही. उपपदार्थांच्या वाढलेल्या किमतीतून त्यांना जो नफा मिळाला आहे तो त्यांनी शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे. उद्योजकांना एक आणि शेतकऱ्यांना दुसरी अशी वागणूक का दिली जाते. निर्यातबंदी उठवली पाहिजे. दोघांना समान न्याय देण्याची सरकारची भूमिका पाहिजे.’’ धनपाल माळी, शंकरराव मोहिते, हणमंतराव पाटील आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पालघरमध्ये रुग्णालयात राडा अंगलट; शिवसेनेच्या कार्यालातून ६ पदाधिकाऱ्यांसाठी फतवा, एकनाथ शिंदेंची भूमिका...

फाटक्या विचारांचे पाकिस्तानी! म्हणतात, आम्हाला Asia Cup नकोय, भारताचा पराभव हवाय; ५५ वर All OUT झाले, हे विसरले Video

Nevasa Elderly Couple: पिण्याचे पाणीही हिरावले! नेवासेतील ज्येष्ठ दाम्पत्याचा संघर्ष; पाइपलाइन तोडली अन् काय घडलं..

कोरोना लसीमुळे कॅन्सर अन् हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलंय? नाना पटोलेंच्या दाव्यात किती तथ्य; खरं काय जाणून घ्या

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

SCROLL FOR NEXT