friend murdered Mohiddin Mulla 
पश्चिम महाराष्ट्र

मोहिद्दीन मुल्लाचा मित्रानेच काढला काटा; आर्थिक देवाण-घेवाणीतूनच कृत्य

शैलेश पेटकर

सांगली : वारणानगर येथील नऊ कोटींच्या लूट प्रकरणातील मुख्य आरोपी मोहिद्दीन अबुबकर मुल्ला याचा खून पैशाच्या देवाण-घेवाणीतूनच झाल्याचे आज तपासात स्पष्ट झाले. जिगरी मित्रानेच मुल्लाचा काटा काढल्याचे समोर आले असून, शहर पोलिसांनी यापूर्वीच चौघांना अटक केली आहे.

रवी हरी चंडाळे (वय 36, रा. शिवाजी मंडई), शफीक अजमुद्दीन खलिफा (वय 45, रा. जोतिबा मंदिराजवळ, सांगलीवाडी), नाना ऊर्फ बाळासाहेब दादासाहेब पुकळे (वय 37, रा. राणाप्रताप चौक, सांगलीवाडी), आप्पा ऊर्फ भीमराव मल्लाप्पा वाणी (वय 36, रा. झाशी कॉलनी, सांगलीवाडी) अशी त्यांची नावे आहेत. चौघांना शनिवारपर्यंत (ता. 6) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की मोहिद्दीन मुल्ला आणि वाणी हे दोघे जिगरी मित्र होते. मात्र, त्यांच्यात पैशाच्या कारणावरून गेल्या काही दिवसांपूर्वी वाद होत होता. वाणीने मुल्लाला काही रक्कम दिली होती. वाणी हा ती रक्कम मुल्लाकडे परत मागत होता. मात्र, मुल्ला पैसे देण्यास असमर्थ होता. त्यामुळे त्यांच्यात पैशावरून वाद होत होते. हा वाद टोकाला गेला होता. त्यामुळे संशयितांनी संगनमताने मुल्लाचा कायमचा काटा काढण्याचे ठरवले. यापूर्वी मुल्लावर दोनदा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, तो अयशस्वी झाला होता. 

शुक्रवारी रात्री हल्लेखोरांनी कट रचला. मुल्ला हा गणेशनगर येथील सर्वधर्म चौकात आल्यानंतर हल्लेखोरांनी नियोजनबद्धपणे मुल्लावर कोयत्याने सपासप वार करून त्याचा खून केला. यावेळी संशयित शफीक खलिफा हाही यावेळी जखमी झाला. पोलिसांनी चौघा हल्लेखोरांना अटक केली आहे. 

पुकळेला व्हायचे होते "दादा' 
दरम्यान, मुल्ला खूनप्रकरणातील संशयित आरोपी नाना पुकळे याला "दादा' व्हायचे होते. त्यामुळे त्याने हल्लेखोरांना साथ दिल्याचे पोलिसांनी सांगितले; तर यातील संशयित आरोपी शफीक खलिफा यालाही त्याच्या कामाचा मोबदला मिळणार असल्याने तो या कृत्यात सामील झाला होता. आता सर्वचजण या खून प्रकरणात अडकले आहेत. 

संपादन :  युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder: सिलेंडरसाठी वाट पाहणं संपलं! इंडेनचा ‘छोटू’ LPG सिलेंडर बाजारात; किराणा दुकानातही सहज मिळणार

Latest Marathi News Live Update : - बुलढाण्यातील संग्रामपूर तालुक्यात वादळी पावसाचा फटका; मका पिकाचे मोठे नुकसान

Ashok Kharat case investigation : अशोक खरातची एसआयटीकडून ५ तास चौकशी, VIP, महिला आणि व्यवहारांसाठी वेगवेगळे मोबाईल नंबर; धक्कादायक माहिती उघड

Shabbir Ahmed: मोठा दहशतवादी कट उघड! ३ मंदिरांची पाहणी; व्हिडिओ शूट करून पाकिस्तानला पाठवले, शब्बीर लोनचे धक्कादायक खुलासे

Vande Bharat: ‘वंदे भारत’च्या डब्यांची संख्या वाढणार! 'या' रेल्वेच्या वेळापत्रकातही बदल, प्रशासनाचा निर्णय; वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT