पश्चिम महाराष्ट्र

सांगली - दत्त इंडियाने कारखान्याने फोडली ऊस दराची कोंडी

यंदाच्या हंगामात साडे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट्ये आहे.

घनशाम नवाथे

यंदाच्या हंगामात साडे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट्ये आहे.

सांगली : जिल्ह्यातील ऊसदराबाबत उत्सुकता वाढली असताना वसंतदादा कारखाना भाडेतत्वावर चालवणार्‍या दत्त इंडिया कंपनीने कोंडी फोडली. एकरकमी एफआरपी 2821 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली. तसेच कामगारांना 19 टक्के बोनस व दहा किलो साखर देण्याचे जाहीर केले.

दत्त इंडिया कंपनीचा पाचवा गळीत हंगाम प्रारंभ आज गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, दत्त इंडियाचे संचालक चेतन धारु, करण रुपारेल, उपाध्यक्ष मृत्युंजय शिंदे, शरद मोरे, वसंतदादाचे उपाध्यक्ष सुनील आवटी व संचालक उपस्थित होते. महंत विद्वांस शामसुंदर शास्त्री यांच्याहस्ते मोळीचे पूजन झाले.

उपाध्यक्ष शिंदे म्हणाले, यंदाच्या हंगामात साडे दहा लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट्ये आहे. ऊसाला एकरकमी 2821 रुपये एफआरपी दिली जाईल. कामगारांना सव्वा दोन पगार इतका बोनस दिला जाईल. वसंतदादाची थकीत रक्कम वर्ग केली जाईल. शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास आणावा. बाहेरुन काटा करुन ऊस आणल्यास तो स्विकारला जाईल. वसंतदादा कारखान्यात गेल्या 62 वर्षात कधीही काटामारी झाली नाही. यावेळी कामगार संघटनेचे प्रदीप शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे, जिल्हा बॅंक सरव्यवस्थापक बी. एम. रामदुर्ग आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT