The fuss of corona restrictions in Sangli; Crowds from the market, shops also opened 
पश्चिम महाराष्ट्र

सांगलीत निर्बंधांचा फज्जा; बाजारपेठेतून तुडूंब गर्दी, दुकानेही उघडली

बलराज पवार

सांगली : शासनाने कोरोनाला रोखण्यासाठी आजपासून मिनी लॉकडाउनचे आदेश दिले आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी शासनाचे आदेश झुगारून देत आज बाजारपेठ सुरूच ठेवली. भाजी विक्रेतेही रस्त्यावरच बसल्याने बाजारात गर्दी होती. त्यामुळे आज दुपारपर्यंत या निर्बंधांचा फज्जा उडाला होता. सायंकाळच्या सत्रात पोलिस आणि महापालिका कर्मचाऱ्यांनी बाजारपेठेत फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. यावरून व्यापारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडले. 


कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने शासनाने आजपासून राज्यभरात मिनी लॉकडाउनची घोषणा केली. यात अत्यावश्‍यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ, मॉल, जिम, चित्रपटगृहे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली आहे.

परंतु, आज सकाळपासूनच शहरातील बाजारपेठा सुरू होत्या. लॉकडाउनचा प्रभाव दिसत नव्हता. सणासुदीच्या काळात व्यापार बंद ठेवून नुकसान करून घेण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे व्यापारी संघटनांनी या लॉकडाउनला विरोध करीत दुकाने सुरू ठेवण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता. त्याचा प्रभाव दिसून आला. मारुती रोड, गणपती पेठ, मेन रोड, सराफ कट्‌टा या भागात तसेच विश्रामबाग परिसरातही व्यापाऱ्यांनी दुकाने सुरूच ठेवल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे दुपारपर्यंतचे चित्र लॉकडाउनचा फज्जा उडाल्याचे दिसत होते. 


सायंकाळी मात्र प्रशासनाने कडक भूमिका घेत पोलिस आणि महापालिकेची पथके रस्त्यावर उतरली. सर्व बाजारपेठेत फिरून त्यांनी दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्या वेळी काही ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले. मात्र, प्रशासनाचे कडक धोरण पाहता व्यापाऱ्यांनी नरमाईचे धोरण घेतले. 

आजपासून बाजारपेठा बंदच राहणार 
सांगली : शासनाने जाहीर केलेल्या निर्बंधानुसार महापालिका क्षेत्रात अत्यावश्‍यक सेवेच्या आस्थापना सोडून अन्य दुकाने बंदच राहणार आहेत. अन्य आस्थापना सुरू राहिल्यास त्या सक्तीने बंद केल्या जातील. त्यामुळे शासनाच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले. 


शासनाने कोविड 19 च्या अनुषंगाने जाहीर केलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने आयुक्त कापडणीस यांनी दुपारी महापालिकेत बैठक घेतली. महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, शहर उपविभागीय पोलिस अधिकारी अजित टिके, उपायुक्त राहुल रोकडे, नगरसेवक विष्णू माने बैठकीला उपस्थित होते. आयुक्त कापडणीस यांनी व्यापारी संघटना, फेरीवाला, भाजीवाले संघटना यांच्याशी संवाद साधला. 


ते म्हणाले, की महापालिका प्रशासन तिन्ही शहरांत शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करीत आहे. शासनाने जाहीर केल्याप्रमाणे अत्यावश्‍यक सेवा देणाऱ्या आस्थापना वगळता इतर सर्व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्याबाबत जनजागृती केली जात आहे. आज बाजारपेठेत महापालिकेच्या आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अत्यावश्‍यक सेवेची दुकाने वगळून अन्य आस्थापना बंद करण्याचे आवाहन केले. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT