Political workers celebrate the drought declaration while claiming credit for the decision in Gadhinglaj.

 

esakal

पश्चिम महाराष्ट्र

Drought Declaration: निर्णय ‘दुष्काळा’चा, ‘सुकाळ’ श्रेयवादाचा ; भाजप-राष्ट्रवादी पक्ष : गडहिंग्लजला दोन्हीकडील कार्यकर्त्यांत ‘सोशल’ युद्ध

Gadhinglaj Drought Declaration : गडहिंग्लजला दुष्काळी यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय होताच भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत श्रेयवाद सुरू झाला. २२ दिवसांच्या सर्वपक्षीय आंदोलनाच्या यशाचे श्रेय नेमके कुणाला, यावर सोशल मीडियावर वाद रंगला.

सकाळ वृत्तसेवा

गडहिंग्लज : दुष्काळाच्या मागणीसाठी येथील आंदोलन सर्वपक्षीयच होते. त्यामुळे स्वतंत्रपणे श्रेयवाद घेणे तसे चुकीचेच. प्रत्यक्ष रस्त्यावर न उतरलेल्या भाजप व राष्ट्रवादीच्या (अजित पवार) कार्यकर्त्यांनी समाज माध्यमांमधून श्रेयवाद घेण्यात धन्यता मानली. दुष्काळ जाहीर केल्याच्या निर्णयानंतर ‘श्रेयवादाचा सुकाळ’ आजच्या दिवसभराच्या वातावरणातून जाणवला.

येथील दसरा चौकात गेले २२ दिवस सर्वपक्षीय कार्यकर्ते ‘आम्ही सारे एक’ या भावनेतून बसले होते; परंतु आज समाज माध्यमांवर श्रेयवादाचा किस पाडणारे काही कार्यकर्ते रस्त्यावर न उतरलेले होते. महसूलमंत्री बावनकुळे यांनी मुंबईत गडहिंग्लजला दुष्काळी यादीत समाविष्ट केल्याचा निर्णय जाहीर केल्याची बातमी आज सकाळी येथे धडकली. त्यानंतर आमदार शिवाजी पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे यश मिळाल्याचे त्यांच्या फोटोसह तयार केलेले संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजमाध्यमांवर व्हायरल केले.

दरम्यान, काही वेळांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर फटाक्यांची आतषबाजी करत ‘शब्द पाळणारे नेते’ म्हणून मंत्री मुश्रीफ यांचे कौतुक केले. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समाज माध्यमावर सक्रिय झाले आणि मुश्रीफ यांच्या फोटोसह पाठपुराव्याबद्दल अभिनंदनाचे संदेश प्रसारित करू लागले. काही ग्रुपवर तर दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांत वादावादीचे प्रकारही घडले. आपल्याच नेत्याने कसा पाठपुरावा केला, हे सांगताना शेलक्या शब्दात इशारेबाजीही सुरू होती. भाजपच्या एका अधिकृत ग्रुपवर एका कार्यकर्त्याने कहरच केला.

मुश्रीफ स्वतःच याचे क्रेडिट घेत आहेत, आमच्या आमदारांचे यात वाटा असल्याची पोस्ट टाकताच मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांनी स्वतः आमदार पाटील यांच्या पाठपुराव्याबद्दल अभिनंदन करणारे व्‍हिडिओ तयार करून व्हायरल केले. दरम्यान, सायंकाळी आंदोलकांची सभा संपल्यानंतर दसरा चौकात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा करणार असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले.

आंदोलकांनाच श्रेय

समाज माध्यमांवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे संदेश फिरत असतानाच नेटकरी या यशाचे शंभर टक्के श्रेय सर्वपक्षीय आंदोलकांनाच देत होते. दुष्काळ जाहीर करून घेण्याच्या जिद्दीने सर्वच पक्षांतील प्रमुख कार्यकर्ते २२ दिवस आंदोलनाच्या मंडपात बसले. विविध घटकांना सहभागी करून घेतले. दिवाळीही तेथेच साजरी केली. अशा आंदोलकांनाच याचे श्रेय दिले पाहिजे, अशा प्रतिक्रियाही नेटकऱ्यांनी दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Alphonso Mango GI Tag : कोकण हापूस विरुद्ध गुजरातचा वलसाड हापूस वाद शिगेला! अंतिम सुनावणीत नेमकं काय घडलं? संपूर्ण कोकणाचे लक्ष निकालाकडे

Indian Railway Ticket Transfer Rules : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! ऐनवेळी प्रवास रद्द झाल्यास तिकीट वाया जाणार नाही; घरच्यांच्या नावावर करता येणार ट्रान्स्फर, वाचा नियम

Kolhapur Water Pumping Ban : शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! भोगावती आणि पंचगंगा नदीकाठावर 'या' दिवशी राहणार उपसाबंदी; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द

Latest Marathi News Live Update : करवीरला दुष्काळी यादीतून वगळल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; आमदार चंद्रदीप नरके यांचा इशारा

Dharashiv News: डोळ्यादेखत बस जळून खाक; चालकाच्या एका निर्णयाने वाचले १५ जीव!

SCROLL FOR NEXT