Ganesh Utsav 2023 Eco-friendly decoration in Pandharpur using school materials solapur Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Ganesh Utsav 2023 : पंढरीमध्ये शालेय साहित्याचा वापर करीत इकोफ्रेंडली सजावट

डॉ.आसबे यांच्या घरी दरवर्षी गणेश मूर्ती समोर केलेली संपूर्ण सजावट ही इकोफ्रेंडली असते.

राजकुमार घाडगे

पंढरपूर : पंढरीतील हरीओम सोसायटी मधील रहिवासी बालरोग तज्ञ डॉ.सुधीर आसबे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ.ज्योती आसबे यांनी आपल्या घरी शालेय साहित्याचा वापर करून श्री गणेश मूर्तीची इको फ्रेंडली सजावट केली आहे. ही सजावट पाहण्यासाठी हरिओम सोसायटी सह आसपासच्या नगरातील बाल गणेश भक्तांसह त्यांच्या पालकांची गर्दी होत आहे.

डॉ.आसबे यांच्या घरी दरवर्षी गणेश मूर्ती समोर केलेली संपूर्ण सजावट ही इकोफ्रेंडली असते. यंदा देखील आसबे दांपत्याने बुद्धीची देवता असणाऱ्या गणपती समोर सजावट करताना शालेय साहित्याचा वापर अतिशय कल्पकतेने केला आहे.

स्केच बुक, वही, पेन, सिसपेन्सिल, खोड रबर, फुटपट्टी, स्केच पेन इत्यादी साहित्याचा कल्पक पद्धतीने वापर करत सुंदर सजावट केली आहे. फुलस्केप वही व छोट्या वहयांचा वापर करून गणपती बाप्पाची बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे. शालेय साहित्याचा वापर करून साकारण्यात आलेली ही सजावट संपुर्णपणे इकोफ्रेंडली आहे.

या सजावटीच्या माध्यमातून शैक्षणिक संदेश तर दिला जात आहेच परंतु सामाजिक बांधिलकी म्हणून गणेश विसर्जना नंतर सजावटीसाठी वापरण्यात आलेले संपूर्ण शालेय साहित्य हे गरजू शालेय विद्यार्थ्यांना वाटप करणार असल्याचे डॉ.ज्योती आसबे यांनी 'सकाळ' शी बोलताना सांगितले. आसबे कुटुंबीयांनी आपल्या इकोफ्रेंडली गणेश सजावटीतून समाजासमोर एक उत्तम उदाहरण निर्माण केले आहे.

त्यांच्या कल्पनेचे, कलाकृतीचे व सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. * दरवर्षी श्रीगणेश सजावटीतून आम्ही समाजाला काही प्रबोधनात्मक संदेश देण्याचं प्रयत्न करत असतो. हा संदेश देत असताना सजावटीतून पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही याची देखील काळजी घेत असतो.- डॉ.सुधीर आसबे, बालरोग तज्ञ, पंढरपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT