sound system sakal
पश्चिम महाराष्ट्र

आवाज झाला; पण नाही मोजला!

प्रदूषण नियंत्रण मंडळाला आवाज मोजायला पोलिस प्रशासनाने बोलावलेच नाही

सकाळ वृत्तसेवा

सांगली : यंदा गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘निर्बंधमुक्त’ आवाज घुमला. पोलिसांनी गेल्या दशकभरात सातत्याने साऊंड सिस्टिमचा आवाज मर्यादित ठेवण्यासाठी आग्रही व प्रसंगी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी पोलिसांनी आवाजाकडे दुर्लक्षाची भूमिका घेतलीच; शिवाय एक गंभीर बाब समोर आली असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर्षी मिरवणुकांत वाद्यांचा आवाजच मोजला नाही. ‘आम्हाला आवाज मोजायला बोलावलेच नाही,’ असे स्पष्टीकरण पोलिस विभागाकडून देण्यात आले आहे.

मिरजेतील विसर्जन मिरवणुकांत यंदा साऊंड सिस्टिमचा प्रचंड दणदणाट ऐकायला मिळाला. यावर्षी पोलिसांकडून आडकाठी होणार नाही, असा संदेश आधीच मंडळांपर्यंत पोहोचला होता. त्याला निमित्त काहीही असो; मात्र मंडळांनी मर्यादा सोडली ही वस्तुस्थिती समोर आली. मिरजेत मर्यादेपेक्षा अधिक आवाज घुमला. ग्रामीण भागातही आवाजाच्या भिंती उभ्या केल्या गेल्या होत्या. या आवाजाची तपासणी पोलिसांनी केली.

त्यांच्याकडे यासाठीची संपूर्ण यंत्रसामग्री आहे. पोलिसांवर सार्वजनिक उत्सवातील प्रदूषण नियंत्रणाची जबाबदारी आहे. परंतु, एवढ्या मोठ्या उत्सवात दरवर्षी पोलिस प्रदूषण नियंत्रण मंडळाची मदत घेतात. यावर्षी मात्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला पोलिसांना बोलावलेच नाही, असे सांगण्यात येत आहे. प्रदूषण नियंत्रणकडे ‘सार्वजनिक उत्सवातील ध्वनिप्रदूषणाची जबाबदारी आमच्याकडे येत नाही,’ असे सांगून हात वर करण्यास पुरेपूर संधी आहे. त्यामुळे ‘आम्हाला बोलावलेच नाही,’ असे पोलिसांनी स्पष्ट केले. कुणी अवाजवी आवाजात मिरवणूक काढली, किती आवाज होता, याच्याशी या मंडळाचा संबंध राहिला नाही. पोलिसांनीही या मुद्द्यावर पळवाटा शोधणारी उत्तरे तयार ठेवली आहेत. ‘मिरवणुका एकत्र निघतात, कुणाच्या वाद्यांतून किती आवाज निघाला, हे मोजणे कठीण जाते,’ असे उत्तर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे ‘निर्बंधमुक्त’ आवाजाचा विषय आता हवेत विरला आहे.

आरोग्य बिघडून जाईल...

गणेशोत्सवातील उत्साहाला, जल्लोषाला कुणाचीच ना नाही; पण ती कधीपर्यंत... जोवर शारीरिक आणि सामाजिक आरोग्य धोक्यात येत नाही तोवर. गणेश विसर्जनावेळच्या आवाजाने अनेकांना कानाची समस्या सुरू झाली आहे. शिवाय, आता ध्वनिमर्यादेचा कायदाच राहिला नाही किंवा कितीही मोठ्याने वाजवले तरी पोलिस काही कारवाई करत नाहीत, असा संदेश बाहेर गेला आहे. तो सामाजिक आरोग्यास धोका आहे.

सार्वजनिक उत्सवातील ध्वनीची तीव्रता मापण्याचे काम पोलिस दलामार्फत केले जाते. त्यांनी आमची मदत मागितली तर आम्ही जातो. गणेशोत्सवात आम्हाला मदत मागितली नाही. त्यामुळे आम्ही आवाज मोजला गेला नाही.

- नवनाथ अवताडे, उपायुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

Ashok Kharat Case : खरातचे कारनामे संपेनात ! आधी पीडित महिलांची अब्रू लुटायचा अन् मग श्रीमंत पुरूषांशी लैंगिक संबंध ठेवायला लावायचा...

Tungnath Covered in Snow: बर्फाच्या पांढऱ्या चादरीत न्हालेलं तुंगनाथ मंदिर; १२,०७३ फूट उंचीवरील या पवित्र शिवधामाची संपूर्ण माहिती जाणून घ्या एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT