The gang that stole the tractor trolley was kidnapped; Action taken by Rukdi 
पश्चिम महाराष्ट्र

ट्रॅक्‍टर ट्रॉली चोरणाऱ्या टोळीला केले गजाआड; रूकडी येथे कारवाई 

विजय लोहार

नेर्ले (जि. सांगली) : दोन वर्षांपासून सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या ट्रॅक्‍टरच्या ट्रॉली चोरणाऱ्या टोळीला कासेगाव पोलिसांनी कोल्हापूर जिल्ह्यात रूकडी येथे जाऊन गजाआड केले. संग्राम शिवाजी गायकवाड व अस्लम मेहबूब मोकाशी (दोघेही रुकडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.

त्यांच्याकडून तब्बल 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल कासेगाव पोलिसांनी हस्तगत केला. कासेगाव पोलिसांच्या धाडशी कारवाईमुळे तीन जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आठ गुन्हे केल्याची कबुली चोरट्यांनी दिली. 

कासेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की येवलेवाडी (ता. वाळवा) येथील रवींद्र भगवान जाधव यांनी स्वतःची ट्रॅक्‍टर ट्रॉली चोरीला गेल्याची फिर्याद 22 नोव्हेंबर रोजी कासेगाव पोलीस ठाण्यात दिली होती. तपासकामी गती देत सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांनी पथक तयार करून येवलेवाडी ते राष्ट्रीय महामार्गावरील, परिसरातील सर्व सी.सी.टी.व्ही. फुटेजची पाहणी केली. 

पोलिस कर्मचारी अमर जाधव यांना माहिती मिळाल्यानंतर चोरटे कोल्हापूर जिल्ह्यातील रुकडी येथील असल्याचे समजले. चोरटे संग्राम गायकवाड व अस्लम मोकाशी यांना मुद्देमालासह पोलिसांनी तिथे जाऊन पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता कासेगाव, कुरळप, शिराळा, इस्लामपूर, कोल्हापूर, कराड, करवीर, आष्टा, या भागात ट्रॅक्‍टर चोरल्याचे कबूल केले आहे. चोरट्यांकडून दोन ट्रॅक्‍टर, पाच ट्रॉली, गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण 6 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

महामार्ग व ग्रामीण भागातील हॉटेल्स, पेट्रोल पंप, टोलनाके, दुकाने येथील सी. सी. टी. व्ही. फुटेज तपासले. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील चोऱ्या या टोळीने केल्याचे उघड झाले आहे. पोलीस कर्मचारी बी. एच. कुंभार, जयकर सुतार, अमर जाधव, दीपक घस्ते, राहुल पाटील यांनी तपास केला. 

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सिडनीतील दहशतवादी हल्ल्याचं भारतीय कनेक्शन उघड; तेलंगणा पोलिसांनी केली पुष्टी...

Shirur Crime : पुणे–अहिल्यानगर महामार्गावर थरार; शिरूरजवळ तरुणावर कोयता-तलवारीने जीवघेणा हल्ला!

Shirur Extortion : “माझ्या एरियात काम करायचे असेल तर दोन लाख द्या”; शिरूरमध्ये कंत्राटदाराला धमकी देणारा तडीपार गुंड अटकेत!

IPL 2026 Auction live : Unsold खेळाडूसाठी काव्या मारनने मोजले १३ कोटी; सर्फराज खान CSKच्या संघात, पृथ्वी शॉ सर्वांना 'नकोसा'

Latest Marathi News Update : देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर....

SCROLL FOR NEXT