पश्चिम महाराष्ट्र

कांद्यापाठोपाठ लसूण महागला

सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : जेवणाच्या ताटात असलेल्या खमंग, झणझणीत, रुचकर पदार्थांसाठी लागणारा लसूण हा भाव खात आहे. लसणाचे दर वाढल्यामुळे स्वयंपाकात वापरल्या जाणाऱ्या लसणाची जागा नाहीशी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याची दरवाढ सुरू असताना लसूणदेखील सर्वसामान्यांच्या आवाक्‍यात राहिलेला नाही. फोडणीसाठी वापरण्यात येणाऱ्या लसणाचे दर प्रतिकिलो 160 रुपयांवर पोचले आहेत. त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. 

महाराष्ट्रात कांद्याचे दर डोळ्यात पाणी आणत असताना लसणाच्या दरानेही उच्चांक गाठल्याने फोडणी महागल्याची भावना ग्राहकांनी व्यक्त केली आहे. कांद्याच्या पाठोपाठ लसणाचीही दरवाढ कायम दिसून येत आहे. बाजारात लसूण प्रतिकिलो 160 रुपयांवर पोचल्याने ग्राहक चिंतेत आहे. हिवाळ्यात कांदा आणि लसणाला चांगली मागणी दिसून येते. जेवणात दोन्ही घटकांचा नियमितपणे वापर केला जातो. विशेषत मसाल्याच्या भाज्यात लसणाचा अधिक उपयोग होतो. हिवाळ्यात मांसाहाराचा उपयोग होतो. यामुळे कांदा आणि लसणाची मागणी अधिक आहे. वाढणारे दर ग्राहकांचा हिरमोड करणारे ठरत आहे. 

मागणी झाली कमी
काही दिवसांपूर्वी कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात सुरू होते. आता त्याच्यापाठोपाठ लसणाचे दर वाढले गेले आहेत. त्यामुळे स्वयंपाक घरात लागणारा लसूण महागल्याने ग्राहकांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे म्हणावी अशी लसणाची विक्री होत नाही. 
- शांताबाई साळुंखे, लसूण विक्रेती 

वापरही झाला कमी
प्रत्येक वस्तूंचे दर वाढतच चालले आहेत. मध्यंतरी कांदा भाव खात होता आणि आता लसणाचे दर वाढले गेले आहेत. स्वयंपाक करताना अनेक भाज्यांना लसणाची फोडणीच लागते, त्याशिवाय भाजीला चव येत नाही. परंतु आता लसूण महागल्यामुळे त्याचा वापर कमी झाला आहे. 
- अश्‍विनी कोरे, गृहिणी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जणू काळच त्यांच्या तोंडून बोलत होता! उद्या मी असेन नसेन... नाना पाटेकरांचं शेवटचं भाषण अन् ते शब्द खरे ठरले; Video व्हायरल

घरात पत्नीसोबत वादानंतर २९ वर्षीय तरुणाने मारली नाल्यात उडी, रात्रभर शोधानंतर पहाटे सापडला मृतदेह

प्रीती झिंटाच्या संघात खळबळ! IPL 2027 पूर्वी रिकी पाँटिंगच्या २ जवळच्या सहकाऱ्यांचे दणादण राजीनामे; पंजाब किंग्सची डोकेदुखी वाढली

Latest Marathi News Live Update : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सयाजी शिंदेंना मोठा धक्का

Kannad Farmer: मका-कपाशी पिके वाळली, कर्जमाफीच्या यादीतही नाव नाही; कन्नडमध्ये शेतकऱ्याने जीवन संपवले, कर्जाचा ताण वाढला अन्..

SCROLL FOR NEXT