Leopard and Gaur Sakal
पश्चिम महाराष्ट्र

शिराळा शहर व परिसरात गवा आणि बिबट्याचे दर्शन; नागरिकांत घबराटीचे वातावरण

शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे.

शिवाजीराव चौगुले

शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे.

शिराळा - शिराळा शहर (Shirala City) व परिसरातील गावात गव्यांचा (Gaur) वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आज दिवसभरात दोन ठिकाणी १२ गवे दिसल्याने व एका ठिकाणी चार गवे आत उसात घुसताच आतुन बिबट्या (Leopard) बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिराळा शहरासह तालुक्यात बिबट्या पाठोपाठ आता गव्याचे दिवसा व रात्रीही दर्शन होत आहे.

चांदोली राष्ट्रीय उद्याना मध्ये अपेक्षित खाद्य मिळत नसलेने बाहेर मानवीवस्तीत प्राण्यांचा वावर वाढला आहे. बिबटे, माकडं वानरे यांचा वावर हा नित्याचाच आहे. त्यात आता गव्यांची भर पडली आहे. शिराळा शहरासह तालुक्यात अनेक गावांत महिन्यातून एक वेळ तरी कोणत्या ना कोणत्या गावात पाळीव प्राण्यावर बिबट्याचा हल्ला झालेला असतो. माकडं व वानरे पिकांचे नुकसान करीत आहेत. त्यात या प्राण्यांबरोबरच गव्यांची भर पडली आहे.

आज सकाळी साडे सहा ते साडे नऊ पर्यंत जांभळेवाडी च्या नाळ व बामन उगळी परिसरात चार गवे ग्रामस्थांना दिसले. त्या ठिकाणाहून त्यांना लोकांनी सुजयनगर परिसरात हुसकवले. त्या गव्यांच्या मागावर ग्रामस्थ लक्ष ठेवून असताना गवे शिंदे यांच्या उसात घुसले असता अचानक उसातून बिबट्या बाहेर आला.त्यामुळे लोकांची धावपळ उडाली. बिबट्या अन् गवा एकाच वेळी या परिसरात वावरत असल्याने लोकांच्या शेतात जाताना भितीचे वातावरण पसरले आहे.

भागाईवाडी परिसरात ही आज ८ गव्यांच्या कळपाचे लोकांना दर्शन झाले आहे. या दोन्ही ठिकाणी वनक्षेत्रपाल सचिन जाधव याच्या मार्गदर्शनाखाली चंद्रकांत देशमुख, देवकी तसीलदार, हणमंत पाटील, संपत देसाई, बाबा गायकवाड, नामदेव सिद, संभाजी पाटील यांनी भेट देऊनी पहाणी केली. लोकांनी गव्याला हुसकावण्याचा अथवा दगड मारण्याचा प्रयत्न करू नये, ते त्यांच्या मार्गाने निघून जातील याबाबत वन विभागाने परिसरात जागृती करण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman Nina Kutina: माझ्या मुलाची राख चोरीला गेली... गोकर्ण जंगलाच्या गुहेत सापडलेल्या रशियन महिलेचा धक्कादायक आरोप!

Success Story: 'अंध प्रियांका बनली महसूल सहाय्यक'; परिस्थितीशी दोन हात करत यशाला गवसणी, शेणोलीतील युवतीची प्रेरक कहाणी

Nagpur News: जन्मठेपेच्या कैद्याने कारागृहात संपवलं जीवन

100 टक्के मतदार, 'ती' 14 गावं लवकरच महाराष्ट्रात घेणार; सीमाभागातील गावांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Jayakwadi Dam: ‘जायकवाडी’तून शेतीसाठी पाणी; डाव्या-उजव्या कालव्यांतून विसर्ग, शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT