mangalwedha
mangalwedha 
पश्चिम महाराष्ट्र

मंगळवेढा नगरपालिकेची सर्वसाधारण सभा संपन्न

हुकूम मुलाणी

मंगळवेढा - येथील नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पिठासन अधिकारी आणि अधिकारी डॉ पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये विशेष सभेसमोर ठेवलेल्या विषयांना मंजुरी देण्यात आली.

यामध्ये विकास कामकाजासाठी दरमहा नगरसेवकांची सर्वसाधारण सभा होणे आवश्यक असताना नगरसेवकांनी वारंवार मागणी करूनही मासिक सभा न घेतल्याच्या कारणाने पक्षनेते अजित जगतापसह 14 नगरसेवकांनी जिल्हा अधिकाय्राकडे तक्रार केली. त्यानुसार रतनचंद शहा सभागृहात पीठासीन अधिकारी डॉ. पंकज जावळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा सम्पन्न झाली.

या सभेसाठी नगराध्यक्षा अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, पक्षनेते अजित जगताप, प्रवीण खवतोडे मुख्याधिकारी निलेश देशमुख, सर्व नगरसेवक व खातेप्रमुख हजर होते. पहिल्यांदाच नगराध्यक्षा पीठासीन अधिकारी म्हणून न राहता इतर नगरसेवकाप्रमाणे समोर बसल्या होत्या यावेळी नगरसेवक पांडुरंग नाईकवाडी व प्रशांत यादव या सभेला हजर राहिल्याने त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी कुंभार तलाव सुशोभीकरणाचा विषय येताच पक्ष नेते अजित जगताप यांनी कुंभार तलाव सुशोभीकरणाचे काम दिलेल्या मंठालकर नामक ठेकेदाराने ले आउट देऊनही काम केले नाही. तसे राजमाता जिजाऊ शॉपिंग सेंटर मधील कामाची मुदत संपून देखील काम पूर्ण केले नसल्याने नगरपालिकेचे मोठेआर्थिक नुकसान होत महिन्याला 75 हजाराचे भाडे बुडतअसून ठेकेदाराला 39 लाखाचा
दंड आकारावा उपठेकेदार किल्लेदार यांच्या मालमतेवर बोजा चढवून त्यांचे गाळे जप्त करावेत व त्यांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकावे अशी मागणी केली. कामाबाबत कायदेशीर बाबी तपासून काम दुसऱ्या नंबरच्या ठेकेदाराला द्यावे अथवा फेरनिविदा काढण्याचा सूचना प्रशासनाला दिल्या. तसेच निविदेत नसतांना सबलीट ठेकेदार नेमण्याची तरदूत तसेच नागणेवाडी तलावाची जाग महाराष्ट्र शासनाची असून तिथे विकासनिधी कसा खर्च केला ? असे नगरसेवक अनिल बोदाडे यांनी विचारले असता, तुम्हीच सुशोभीकरणाचा ठराव केला आणि तुम्हीच चुकीचे आहे. कसे म्हणता असे विचारत सभेलाच ठराव करण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.  

यावेळी संतसृष्टी उभारणे, धर्मगाव रोडवरील 95 लाखाचे थांबलेले काम पोलीस संरक्षणात करणे माजी सैनिकांच्या मागण्यांचा विचार करणे, यासह विविध प्रभागातील रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविणे रस्ता काँक्रीटीकरण करणे, 15टक्के निधीचे प्रस्ताव पाठविणे याबाबत चर्चा होऊन सर्व विषय मंजूर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

SCROLL FOR NEXT