The general meeting of Sangli District Bank will be held online this year 
पश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा बॅंकेची सर्वसाधारण सभा यंदा "ऑनलाईन' होणार

घनशाम नवाथे

सांगली : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची यंदाची 93 वी वार्षिक सर्वसाधारण सभा सहकार आयुक्तांच्या सूचनेनुसार ऑनलाईन घेतली जाणार आहे. बुधवारी (ता.10) दुपारी एक वाजता बॅंकेच्या वसंतरावदादा पाटील सभागृहात ती घेतली जाईल. सभासदांना कामकाजात सहभागी होण्यासाठी मोबाईलवर "लिंक' पाठवली जाणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. 

जिल्हा बॅंकेची 93 वी सभा बुधवारी (ता.10) दुपारी एक वाजता बॅंकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीतील वसंतरावदादा पाटील सभागृहात होणार असल्याची नोटीस यापूर्वी सभासदांना पाठवण्यात आली होती. प्रतिवर्षाप्रमाणे ही सभा होणार असल्यामुळे सभासद व सदस्य संस्थांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्यासाठी आवाहन केले होते.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन करण्याची सूचना केली होती. परंतू या नोटीसीनंतर कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 50 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास शासनाने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे बॅंक प्रशासनाने सहकार आयुक्त व सहकारी संस्था निबंधकांच्या मार्गदर्शक सुचनेप्रमाणे ऑनलाईन सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

शासनाच्या निर्बंधामुळे गेल्या काही दिवसापासून बॅंकांच्या सभा ऑनलाईन होऊ लागल्या आहेत. आता जिल्हा बॅंकेची सभा देखील दृकश्राव्य (व्हीसी) आणि दृश्‍य संवाद (ओएव्हीएम) द्‌वारे ठरलेल्या दिवशीच म्हणजे बुधवारी (ता.10) दुपारी एक वाजता होईल. ऑनलाईन सभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी सभासदांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर स्वतंत्र "लिंक' पाठवण्यात येणार आहे. 

सभेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी सभासदांनी बॅंकेच्या शाखेमध्ये संपर्क साधून मोबाईल क्रमांक, ई-मेल, व्हॉटस्‌ ऍप सुविधा असलेला मोबाईल क्रमांकाची नोंद 6 मार्च 2021 पर्यंत करावी, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कडू यांनी केले आहे.

संपादन : युवराज यादव 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT