Get ready to face the monsoon now with Corona 
पश्चिम महाराष्ट्र

"कोरोना'सह आता मॉन्सूनचा सामना करण्यास सज्ज रहा

सकाळवृत्तसेवा

सांगली : यावर्षी चांगल्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने गतवर्षी प्रमाणेच यावर्षी सुध्दा जिल्ह्याला पूराचा सामना करावा लागू शकतो. त्याची जाणीव ठेवून यंत्रणांनी युध्दपातळीवर आवश्‍यक ती सर्व सज्जता ठेवावी, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिले. 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणतर्फे आयोजित मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. जि. प. चे सीईओ अभिजीत राऊत, जिल्हा पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे आदी उपस्थित होते. 

जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले,""सर्व यंत्रणांनी कंट्रोल रूम तयार करून 24 तास प्रणाली सुरु ठेवावी. जिल्हा, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनी संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी सतर्क राहावे. संभाव्य आपत्ती काळात परस्पर समन्वय ठेवावा. पाटबंधारे विभागाने संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी आत्तापासूनच नियोजन करावे. कोयनेचा विसर्ग सांगलीसाठी महत्वाचा ठरतो. विसर्ग व त्याचा परिणामाची शास्त्रशुध्द माहिती प्रशासनाला तात्काळ मिळावी यासाठी रिअल टाईम इंन्फॉर्मेशन सिस्टीम त्वरीत कार्यान्वीत करा. अंतर्गत धरणांचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांची समन्वयासाठी बैठक घ्यावी. गतवर्षी बीएसएनएलची यंत्रणा बाधीत झाल्याने सामना करावा लागला. या अनुभवाच्या आधारे लॅंडलाईन, इंटरनेट आणि मोबाईल यंत्रणा सक्षमपणे सुरू रहावी यासाठी आत्ताच आवश्‍यक ती तजवीज ठेवावी, त्यांची तालीम घ्यावी.'' 

पोलिस अधीक्षक श्री. शर्मा यांनी यंदा पूर, त्यासोबत कोरोनाबाबत यंत्रणांनी तयारी करणे आवश्‍यक असल्याचे स्पष्ट केले. तालुका, ग्रामस्तरावरील रेस्कू टीमची यादी तयार करावी, अशा सूचना दिल्या. आयुक्त नितीन कापडणीस म्हणाले,""यंदा पॅचवर्कचे काम 21 मे पूर्वी पूर्ण होईल. महानगरपालिका इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडिट, धोकादायक इमारतींबाबत कार्यवाही केली जाईल. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ यांनी उपाययोजनांची माहिती दिली. 

असे झले निर्णय 

  • रिअल टाईम इंन्फॉर्मेशन सिस्टीम कार्यान्वीत करणे 
  • धरणांचे व्यवस्थापन काटेकोरपणे व्हावे 
  • पूरस्थितीत संवाद यंत्रणा सुरळीत रहावी यासाठी नियोजन 
  • जिल्हा, महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन कक्ष सक्षम करा 
  • एमजेपी, जि.प. ने पूरग्रस्त भागात पाणी पुरवठ्याचे नियोजन करावे 
  • पूरबाधीत 104 गावे आहेत. 52 गावांचे आपत्तीबाबत प्रशिक्षण 
  • उर्वरित 52 गावांचे प्रशिक्षण 17 मे नंतर होणार 
  • प्रत्येक गावाने सक्षम आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा 
  • पूरबाधित गावांसाठी लाईफ जॅकेट, टॉर्च आदिंचे किट देणार 
  • गावांमधील बोट चालविणाऱ्या 5 लोकांना आवश्‍यक ट्रेनिंग देणार 
  • धोकादायक निवासी, शाळेच्या इमारतीबाबत वेळीच कार्यवाही करावी 
  • साथ पसरु नये यासाठी आरोग्य विभाग सज्ज ठेवा 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games: सुवर्णपदकाची हॅट्रीक थोडक्यात हुकली, तजिंदरपाल सिंग तूरने जिंकलं रौप्य; भारत मेडल्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

समृद्धीवर कारची कंटेनरला धडक, आई-वडिलांसह चिमुकल्याचा मृत्यू; पुण्याहून जालन्याला जाताना अपघात

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT