Get vaccinated against polio, but keep a safe distance ... 
पश्चिम महाराष्ट्र

पोलिओ लसीकरण कराच, मात्र सुरक्षित अंतर ठेवून...

विष्णू मोहिते

सांगली : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रतिवर्षाप्रमाणे नव्या वर्षात येत्या 17 जानेवारीला होत आहे. अभुतपूर्व अशा कोरोनाच्या सावटाखाली होणाऱ्या या मोहिमेत पोलिओ लसीकरण कराच, मात्र सुरक्षित अंतर ठेवून, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांनी केले.

"दो बुंद जिंदगीके लेकीन दो गज दुरीसे' असे यंदाच्या पोलिओ लसीकरणाचे घोषवाक्‍यच असेल. यंदा जिल्ह्यात 2 लाख 46 हजार 641 बालकांसाठी 3 लाख 13 हजार 240 डोस तयार ठेवण्यात आल्या आहेत. 

श्री. कदम यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस लसीकरणाच्या मोहिमेबाबत समन्वय बैठक झाली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलींद पोरे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. सुनिल आंबोळे, डॉ. एस. नाईकवाडे उपस्थित होते. 

दुर्गम गावे, वाड्या वस्त्या, स्थलांतरीत कुटुंबे यातील 0 ते 5 वयोगटातील कोणतेही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही. ही काळजी घेतानाच गर्दी टाळा, सुरक्षित अंतर ठेवा. बुथवर सॅनिटायझेशन, थर्मल गन अशा सुविधा ठेवा. नियुक्त कर्मचाऱ्यांना लसीकरण प्रशिक्षणाबरोबरच कोविड-19 च्या अनुषंगानेही प्रशिक्षण द्यावे. लसीकरण मोहिमेबाबत जनजागृती करावी, अशा सूचना कदम यांनी केल्या आहेत. 

दृष्टीक्षेपात मोहिम... 
- 18 जानेवारी 2016 नंतर जन्मलेल्या प्रत्येक बालकाला लस. 
- जिल्ह्यात 2720 बुथवर 5 हजार 440 कर्मचारी, स्वयंसेवकांची नियुक्ती 
- लसीकरणादिवशी स्थलांतरीत बालकांसाठी 979 ट्रान्झिट टीम दिवसभर कार्यरत 
- विट भट्टया, टोल नाके, एसटी बस स्थानक अशा स्थलांतरीत जागांच्या ठिकाणीही लसीकरण


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT