पश्चिम महाराष्ट्र

पंढरपूर : भाविकांच्या सोयीसाठी घाट बांधणी; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार लोकार्पण

अभय जोशी

पंढरपूर : पंढरपूरला चंद्रभागेच्या पैलतीरावर स्नानासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी इस्कॉनने सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून नवीन भव्य घाट बांधला आहे. आषाढी दशमी दिवशी (ता.११) रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या घाटाचे उद्घाटन आणि लोकार्पण सोहळा होणार असून, या घाटाचे प्रभूपाद घाट असे नामकरण करण्यात येणार आहे. अतिशय देखण्या आणि प्रशस्त अशा या घाटामुळे पंढरपूरच्या वैभवात मोठी भर पडली आहे. 

पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणिक दर्शन विठोबाचे,
या संत वचनाप्रमाणे पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांच्या दृष्टिने चंद्रभागेतील स्नानाला अत्यंत महत्त्व आहे. पंढरपूरला आलेले वारकरी प्रथम चंद्रभागा नदीत स्नान करतात आणि मगच विठ्ठलाच्या दर्शनाला जातात.

पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर अकरा प्राचीन घाट आहेत. घाट उतरल्यानंतर विस्तीर्ण वाळवंट ओलांडल्यावर मग चंद्रभागा नदीचे पात्र आहे. काही वर्षांपूर्वी हरिद्वार , ऋषिकेश च्या धर्तीवर नदीचे पात्र वळवून घाटा लगत आणता येईल का असा विचार सुरू होता परंतु तसे केल्यास वाळवंट नाहीसे होईल हे लक्षात आल्याने ती कल्पना मागे पडली होती.

दरम्यान इस्कॉनचे जनक श्रील प्रभुपाद यांचे वरिष्ठ शिष्य लोकनाथ स्वामी महाराज यांनी नदीच्या पैलतीरावर असलेल्या इस्कॉन मंदिरालगत नवीन भव्य घाट बांधण्याचा संकल्प केला होता. आठ वर्षे या घाटाचे काम सुरू होते. सुमारे 15 कोटी रुपये खर्च करून हा भव्य घाट नदीच्या पैलतीरावर बांधण्यात आला आहे.

घाट उभारणीसाठी चा निधी इस्कॉनच्या भक्तांनी उभा केला आहे. या घाटावर चंद्रभागा मंदिर बांधले असून त्यात चंद्रभागा व श्री प्रभुपाद यांच्या मुर्त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत आहे. वारकऱ्यांना आंघोळ करण्यासाठी , कपडे बदलण्यासाठी आणि विश्रांतीसाठी या घाटावर व्यवस्था करण्यात आली आहे. हरिद्वार, ऋषिकेशप्रमाणे रोज संध्याकाळी चंद्रभागा नदीची आरती या घाटावरून केली जाणार आहे. 

लोकनाथ स्वामी महाराज यांचा 12 जुलै रोजी 70 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जगभरातील 7000 भक्त पंढरपूर येथील इस्कॉन मंदिरामध्ये येणार आहेत.

आषाढी यात्रेच्या निमित्ताने 70 हजार भाविकांना एकादशीचा प्रसाद वाटप केला जाणार आहे. 70 तास सलग सामुहिक हरेकृष्ण जप या घाटावरून केला जाणार आहे. नदीच्या पैलतीरावर झालेल्या या घाटामुळे पंढरपूरच्या वैभवात मोठी भर पडली आहे.

नदीच्या पैलतीरावर असलेल्या इस्कॉन मंदिरात गुरुकुल सुरू केले जाणार असून तिथे शंभर विद्यार्थ्यांची व्यवस्था केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT