Girl Rape Case Hang On Cafe esakal
पश्चिम महाराष्ट्र

कॅफेत गुंगीचं औषध देऊन मुलीवर बलात्कार प्रकरणी Hang On Cafe चालकास अटक; 'पोक्सों'तर्गत पोलिसांची कारवाई

शंभर फुटी रस्‍त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला.

सकाळ डिजिटल टीम

शंभर फुटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’मध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला.

सांगली : शंभर फुटी रस्‍त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’त गुंगीचे औषध देऊन मुलीवर बलात्कार करण्यात आला. कॅफेतील कंपार्टमेंट तयार संशयितास जागा उपलब्ध करून दिल्याप्रकरणी कॅफे चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला. अनिकेत प्रताप घाडगे (अशोक स्फूर्ती बंगला, रामकृष्ण परमहंस सोसायटी, शंभर फुटी रस्ता, सांगली) असे संशयित कॅफे चालकाचे नाव आहे.

‘पोक्सो’च्या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कॅफेतील गैरप्रकारासंदर्भात तपसाणीचे आदेश अधीक्षक संदीप घुगे यांनी दिले आहेत. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की शंभर फुटी रस्त्यावरील ‘हँग ऑन कॅफे’मध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार तीन दिवसांपूर्वी उघडकीस आला. त्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शंभरफुटी रस्त्यावरील ‘हॅंग ऑन कॅफे’वर हल्लाबोल केला.

सर्व केबिन, फर्निचर व साहित्याची तोडफोड केली. विश्रामबाग पोलिस घटनास्थळी येऊन पाहणी करत असतानाच कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौक गाठला. खरे मंगल कार्यालयाजवळील इमारतीतील ‘डेनिस्को’ आणि ‘कॅफे सनशाईन’ या कॅफे शॉपची देखील त्यांनी तोडफोड केली. दरम्यान, पोलिसांनी ज्या कॅफेत अत्याचाराची घटना घडली, त्या ‘हँग ऑन कॅफे’चा चालक अनिकेत घाडगे यास या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे.

अपराध करणे सोयीचे व्हावे, यासाठी कॅफेमध्ये बसलेले ग्राहक एकमेकांना दिसू नयेत, याकरिता पडदे लावले होते, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील कॅफेमध्ये अनधिकृत बांधकाम, आडोसा केल्यास कारवाई करण्यात येत आहे. गैरप्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा.

१६ जणांची मुक्तता

दरम्यान, तोडफोड प्रकरणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या सोळा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यांची दोन दिवसांची पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्यांची मुक्तता करण्यात आली आहे.

कॅफे चालकाला वाचवण्यास नेते

ज्या कॅफेत बलात्काराची घटना घडली, त्यात चालकाला ‘पोक्सों’तर्गत अटक केली. त्याने कॅफेत कंपर्टमेंट केल्याचे समोर आल्यानंतर कारवाई केली. कॅफे चालकाला वाचवण्यासाठी माजी महापौर, युवा नेते पोलिस ठाण्यात आले होते. अशा संवेदनशील गुन्ह्यात तरी गांभीर्य दाखवायला हवे होते. मात्र, सांगलीसाठी लांच्छनास्पद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT