girl rep 
पश्चिम महाराष्ट्र

आक्रीतच, पोटच्या मुलीवर... 

सकाळ वृत्तसेवा

नगर : आईचे निधन झाल्याने ती अनाथ झाली. बाप होता, पण त्याला बाप म्हणावे कसे? असेच घरात वातावरण. लहानपणापासून तिच्या वाट्याला वनवास आला. घरात आजी होती, तीच काय तिची जवळची, बाकी सगळं वातावरण तिच्यासाठी नरक होतं. तशाही स्थितीच ती जगण्याची उमेद हरली नव्हती. तसंही चूक काय, बरोबर काय हे कळण्याचं तिचं वय नव्हतं. आणि इथंच घात झाला. 

घरातून लोकांना हाकलून द्यायचा 
घरातील लोकांसोबत तिचा बाप रोज भांडायचा. त्याच्यावर रागवून ती घराबाहेर जायची. आणि इथेच त्या मुलीच्या बापाने डाव साधला. आणि तिच्यावर अत्याचार केला. ती घाबरली. कोणाला काहीच सांगितली नाही. मग त्या नराधम बापाला चटकच लागली. तो दररोज घरातील लोकांना हाकलून द्यायचा. मुलगी रोज मरत होती. परंतु हे मरणं कोणालाच दिसत नव्हतं. 

आजीनेच दिली मुलाविरूद्ध फिर्याद 
तो पोटच्या गोळ्यावर अत्याचार करीत असे. असा प्रकार त्याने वारंवार केला. बापाच्या भीतीने मुलीने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, हा प्रकार असह्य झाल्यावर मुलीने आजीला (आरोपीच्या आईला) हा सर्व प्रकार सांगितला. आजी हे ऐकून हबकूनच गेली. आजीने नातीसह लगेच नेवासे पोलिस ठाणे गाठले. पोलिसांना सर्व हकीकत सांगितली. पोलीसह चक्रावून गेले. मग त्या माऊलीने स्वत:च्या मुलाविरोधात फिर्याद दिली. मुलगा कसला तो राक्षसच. त्या महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. 

20 वर्षे सश्रम कारावास 
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे आठ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी, पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने पीडित मुलीच्या नराधम बापास विविध कलमांन्वये 20 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व 14 हजार रुपये दंड केला. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील मयुरेश नवले यांनी काम पाहिले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑफिसला यायला उशीर होतो... दहिसरवरून येताना ट्राफिक लागतं, मला भायखळ्याला बंगला द्या; BMC उपमहापौरांची अश्विनी भिडेंकडे मागणी

Karad Development: आंदोलनापेक्षा विकासाचा हिशेब द्या; भाजप नगरसेवकांना इंद्रजीत भोपते यांचा सवाल, 'घोषणाबाजी नव्हे तर नियोजन महत्त्वाचे'

Latest Marathi News Live Update : बनावट कागदपत्रांच्या आधारे पाकिस्तानी नागरिक कर्नाटकात; 'एसआयआर' मोहिमेदरम्यान प्रकार उघडकीस

Blue Aadhaar Card : आता घरबसल्या बनवा ५ पाच वर्षांपर्यंतच्या बाळाचं आधार कार्ड, सोपी आहे प्रक्रिया

Tamil Nadu Cow Slaughter Ban : सर्वोच्च न्यायालयाकडून तामिळनाडूतील 'विजय सरकार'ला दिलासा; गोहत्या बंदीबाबत मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

SCROLL FOR NEXT