karjamukti.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

या गावातील 596 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र

सकाळवृत्तसेवा

सांगली- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील म्हैसाळ येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकरण करून या योजनेची सुरुवात जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्याहस्ते यांच्याहस्ते आज झाला. जिल्ह्यातील 90 हजार 107 पात्र शेतकऱ्यांच्या याद्या 28 फेब्रुवारीपर्यंत उपलब्ध होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

म्हैसाळ येथील 375 व बनपुरी येथील 221 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. 
कर्जमुक्ती योजनेचा जिल्ह्यातील मिरज तालुक्‍यातील म्हैसाळ, आटपाडी तालुक्‍यातील बनपुरी येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करण्यात आले. म्हैसाळ येथील वसंत विकास सोसायटीमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपनिबंधक मिरज आदीनाथ दगडे तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. 


उपनिबंधक करे म्हणाले की, म्हैसाळ येथील 375 व बनपुरी येथील 221 पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर असून त्यांचे आधार प्रमाणिकरण केले जाणार आहे. या याद्यामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्यांची त्या-त्या स्तरावर निर्गती केली जाईल. आधार प्रमाणिकरण केलेल्या शेतकऱ्यांना पोच पावत्यांचे वितरणही त्यांच्या हस्ते झाले. 


श्री. करे म्हणाले, या योजनेच्या अंमलबजावणीत कोणत्याही त्रुटी राहु नयेत, यासाठी प्रशासन सतर्क असून जिल्ह्यातील 90 हजार 107 थकबाकीदार शेतकरी सभासदांची जवळपास 528 कोटी रूपयांची कर्जमाफी होवून हे शेतकरी कर्जमुक्त होतील. या सर्व शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली असून 28 तारखेपर्यंत याद्या उपलब्ध होतील. या याद्या ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, विकास सोसायटी तसेच जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या संबंधित शाखेत लावल्या जातील. 


म्हैसाळ येथील शेतकरी संजय बापू पाटील यांनी आधार प्रमाणीकरणानंतर व्यक्त करुन ते म्हणाले," कर्जमुक्ती योजनेमुळे माझे 1 लाख 53 हजार 551 रूपयांचे कर्ज माफ झाल्यने दिलासा मिळाला. आजारपणामुळे द्राक्ष बागेकडे लक्ष देता न आल्याने वसंत विकास सोसायटीचे 1 लाख 53 हजार 551 रूपयांच्या कर्जाची परतफेड करणे अशक्‍य झाले होते. यावेळी वसंत विकास सोसायटीचे अध्यक्ष धनराज शिंदे, सचिव भरत माळी, ग्रामपंचायत सदस्य दौलत शिंदे यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय ? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन ! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT