Education goal
Education goal 
पश्चिम महाराष्ट्र

शिक्षणाची आस.. समाज बदलाचा ध्यास

अर्चना बनगे

कोल्हापूर -  ‘‘आम्ही आता शाळेला जाणार, आम्हाला शिकायचं आहे...’ असे म्हणत गोसावी समाजातील तरुण पिढी आता समाजाच्या प्रवाहात येत आहे. चार वर्षांपासून या समाजाने बदल स्वीकारत मुलींना शिक्षण आणि अठरा वर्षांच्या पुढे मुलीचे लग्न हा निर्णय घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. 

गोसावी समाज हा तसा सुरुवातीपासूनच शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होता. पूर्वीपासूनच भंगार गोळा करणे, प्लास्टिकच्या वस्तू गोळा करणे, तसेच टिकली, फनी, कंगवा, कानातले डूल, वेगवेगळ्या प्रकारचे चाफ भरलेली बकेट डोक्‍यावर घेऊन गावभर फिरून, होईल ते विक्री करून आपला उदरनिर्वाह करणारा हा समाज. असे काम असल्यामुळे मुलीला घरात न ठेवता तिला लहान वयातच लग्नाच्या बंधनात अडकून तिला तिच्या घरी पाठवले जायचे. मात्र, आता काळानुरूप त्यांनी बदल स्वीकारला आहे.

महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तीन राज्यांत गोसावी समाजाची जास्त प्रमाणात वसाहत आहे. हा समाज १८ जातींमध्ये विखुरला आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी भटकंती करणारा असा हा समाज आहे. आपल्याप्रमाणेच आपली मुलेही याच व्यवसायात गुंतू नयेत, असे आता अनेकांना वाटू लागले आहे. त्यामुळेच शिक्षण आणि योग्य वयात लग्न हा विचार त्यांच्या मनात पक्का होऊ लागला आहे. हळूहळू या भटकंतीला कुठेतरी फाटा देत आता शिक्षणाची कास धरण्याचा आणि मुलीचे वय १८ वर्षे, तर मुलाचे वय २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय या समाजाने घेतला आहे. त्यात महिलाही अग्रेसर आहेत. वय १४ असताना आमचे लग्न झाले. शिक्षण काय असतं, हे आम्हाला माहीत नाही; पण आता आमच्या मुलांना, मुलींना आम्ही शिकवून चांगले संस्कार देणार आहोत. भंगार गोळा करणारे, चाफ विकणारे असे चित्र बदलून आम्ही चांगल्या संस्कारांनी या मुलांना समाजात उतरण्याचा प्रयत्न करणार आहोत, अशी भावना गोसावी समाजातील माता-भगिनींनी व्यक्त केली.

आम्हाला परिस्थितीमुळे शिकता आले नाही; पण आम्ही आता आमच्या पुढच्या पिढीसाठी शिक्षण आणि मुलीचे योग्य वयात लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत.
- रघुनाथ गोसावी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT