Satej Patil comment on Gokul Multi-state issue 
पश्चिम महाराष्ट्र

मल्टिस्टेट रद्द, तरीही आमदार सतेज पाटील यांनी दिला इशारा

सुनील पाटील

कोल्हापूर - मल्टिस्टेट करण्यासाठी दिल्लीत असणारा गोकुळचा ठराव रद्द करणार असल्याचे पत्र देवून सर्वसाधारण सभेतही जाहीर केले आहे. तरीही, कागदोपत्री इतिवृत्त मंजूर करून आणि गोकुळ मल्टिस्टेट करून दाखवावाच, अशा इशारा आमदार सतेज पाटील यांनी आज दिला.

जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघाची 57 वी वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यानंतर आमदार पाटील यांनी अजिंक्‍यतारा येथे पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये ते बोलत होते. 

आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळ मल्टिस्टेट होवू नये यासाठी जिल्ह्यातील दूध उत्पादकांनी लढा उभारला. यामध्ये खासदार संजय मंडलिक, आमदार हसन मुश्रीफ, माजी आमदार चंद्रदीप नरके, आमदार विनय कोरे, ज्येष्ठ नेते संपतराव पवार - पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील यांनी यासाठी पुढाकार घेतला.

गोकुळ दुध उत्पादकांना गोकुळ मल्टिस्टेट नको आहे. तरीही, तो रेटून केला जावू नये यासाठी गेल्या वर्षी गोकुळच्या सभेत याला कडाडून विरोध झाला. अजूनही दूध उत्पादक शेतकरी शांत झालेले नाहीत. आजच्या सभेत गेल्यावर्षीचे इतिवृत्त मंजूर केले जाणार होते. यासाठी काल प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

आमदार पी. एन. पाटील यांनी मोबाईलवरून हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधून गोकुळ मल्टिस्टेटचा निर्णय रद्द करणार असल्याचे सांगितले होते. आमच्या मागणीनूसार गोकुळचे अध्यक्ष रविंद्र आपटे यांनी दिल्लीत पाठवलेला प्रस्ताव रद्द करणार असल्याचे जाहीर केले आहे. तसा व्हिडिओ आणि पत्रही आमच्याकडे असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. 

आमदार पाटील म्हणाले, इतिवृत्त वाचून मंजूर केले अशी तक्रार येत आहे. मात्र, त्यांनी स्वत: पत्र दिले आहे. याशिवाय, सभेतही गोकुळ रद्द करणार असल्याची घोषणा करूनही त्यांना आमची नव्हे, तर दुधउत्पादक शेतकऱ्यांची फसवणूक करून दाखवावीच, मग आम्ही आमचा लढा काय आहे. ते दाखवून देतो, असा इशाराही आमदार पाटील यांनी दिला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑनलाइन ग्रोसरी ऑर्डर करण्याआधी सावधान! Blinkit च्या फ्रीजरमध्ये जिवंत उंदीर आढळला; स्टोअरचा व्हिडिओ व्हायरल

पेपरमध्ये ढीगभर चुका, UGC-NET परीक्षेचे तीन पेपर पुन्हा होणार, तारीखही जाहीर...

Rohit Sharma: बाप रे बाप...! सायकलवरून हजारो किमीचा प्रवास करून आलेल्या फॅनला भेटल्यावर कशी होती रोहितची रिअ‍ॅक्शन, Viral Video

Phone Charging Tips: Airplane Mode ON करून फोन चार्ज केला तर काय होतं? जाणून घ्या

Shirur Bypass Crash: शिरूर बायपासवर पुन्हा बळी; तुटलेल्या दुभाजकातून दुचाकी नेणे जीवावर बेतले

SCROLL FOR NEXT