good health for 105 years men 
पश्चिम महाराष्ट्र

...त्यामुळे १०५  वर्षाचे आजोबा अजूनही ठणठणीत   

सकाळ वृत्तसेवा

बेळगाव : बदलत्या जीवनशैलीमुळे व अन्य विविध कारणांमुळे अनेकजण वयाच्या साठी-सत्तरीतच "हे राम' म्हणतात. अशा स्थितीत 105 व्या वर्षांची व्यक्ती अजूनही तब्येतीने धडधाकट आणि मनाने चिरतरुण असू शकते, यावर अनेकांचा विश्‍वास बसणार नाही. मात्र, अशी व्यक्ती बेळगावातच आहे. या तरुणाचे नाव आहे रामचंद्र बाळाप्पा गिंडे. 

मूळचे जालगार गल्लीतील असणाऱ्या श्री. गिंडे यांचे बसव कॉलनीत घर आहे. त्यांनी 105 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल कॉलनीतील रहिवासी आणि त्यांच्या नातेवाईकांतर्फे त्यांचा नुकताच सत्कार झाला. यावेळी श्री. गिंडे यांनी आपला जीवन प्रवास उलगडताना उपस्थितांना थक्क करुन सोडले. विविध क्षेत्रात सुमारे 80 वर्षे सेवा केलेल्या श्री. गिंडे यांनी आरोगी, आनंदी आणि सुखी जीवनाचा गुरुमंत्रच सांगितला. 

गरीबीमुळे उच्च शिक्षण घेता न आल्याने त्यांनी बेळगाव म्युन्सिपॉलिटीत सेवा सुरु केली. एक वर्षानंतर त्यांना महसूल खात्यात नोकरी मिळाली. त्यानंतर अनेक ठिकाणी शिरस्तेदार, सर्कल, तहसीलदार म्हणून त्यांनी सेवा बजावली. त्यावेळी त्यांनी शाळांच्या इमारती बांधण्यासाठी मोठे योगदान दिले होते. कारवारमधून ते 1970 मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर स्मॉल फार्मर्स डेव्हलपमेंट एजन्सीचे व्यवस्थापक म्हणून शासनाने त्यांची नियुक्ती केली. या पदावर त्यांनी 13 वर्षे सेवा केली. तर 1983 ते 2010 पर्यंत शेख होमिओपॅथिक कॉलेजमध्ये व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली. प्रामाणिकपणा, शांत स्वभाव, नम्रता, मन आनंदी ठेवणे, सतत कामात असणे हे आपल्या आरोग्याचे रहस्य असल्याचे ते सांगतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

धक्कादायक! तरुणाने ग्लासात फटाका पेटवला, तेवढ्यातच मोठा स्फोट झाला अन्...; नेमकं काय घडलं?

Air Pollution : तंबाखूपेक्षा जास्त मृत्यू वायू प्रदुषणामुळे! भारता रोज ५७०० लोक गमावायेत जीव, धक्कादायक अहवाल समोर...

Jalna News : अंबड-घनसावंगी तालुक्यातील 252 गावासाठी 139 पोलिस पाटील पदासाठी पात्र; 26 गावाना मिळाल्या पोलिस पाटील

दिवाळीत गोड खाण्यावर ठेवा नियंत्रण! शरिरावरील दुष्‍परिणाम टाळण्यासाठी आहारतज्‍ज्ञांचा सल्‍ला

Black Magic Incident : मंचर स्मशानभूमीत जादूटोण्याचा संशय; अंधश्रद्धेचे काळे सावट कायम

SCROLL FOR NEXT