good news corona positive become today negative 
पश्चिम महाराष्ट्र

जीव पडला भांड्यात ; गोवा सरकारने त्याला काल पॉझीटीव्ह घोषीत केले अन् आज तो झाला निगेटीव्ह....

सकाळ वृत्तसेवा

जोयडा : गोवा सरकारने पॉझीटीव्ह घोषीत केलेला अनशीतील (ता.जोयडा, जि. कारवार)) तरूण पून्हाचाचणीत दुसऱ्याच दिवशी निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्याने जोयडा तालुकावासीयांचा जीव भांड्यात पडला आहे. कारण, गोव्यात मजूर असणारा हा तरूण गावी परतल्यानंतर अनेक गावांत फिरला होता. त्याच्या संपर्कात अनेकजन आले होते. कारवार जिल्हा प्रशासनानेदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे

.गुरूवारी जोयडा तालुक्यातील अनशी ग्राम पंचायत क्षेत्रातील कट्टे काडपोळ येथील युवक कारवार मार्गे गोव्याला निघाला होता. सीमावर त्याला अडवून त्याच्या घशातील द्राव तपासणीसाठी घेतला होता. युवकाला गोव्यात कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी  सोमवारी घोषित केले होते. त्यानंतर तो काम करीत असलेल्या कंपनी व्यवस्थापनाने त्याची पुन्हा तपासणी व्हावी अशी मागणी केली होती. त्यानंतर त्याची पुन्हा तपासणी करण्यात आली. कारवारच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही त्याच्या रक्ताचे नमुने गोवा सरकार कडून मागवून घेतले होते. दोन्ही ठिकाणी त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. 

युवकाला कोरोना पॉझिटिव्ह घोषित केल्याने जोयडा तालुक्यात भीतीचे वातवरण निर्माण झाले होते. सदर युवकाने 8 मे रोजी दुचाकी खरेदी केली होती. त्यानिमित्ताने पेढे वाटाण्याच्या निमित्ताने रामनगर, जोयडा, कारवार भागात त्याच्या फेऱ्या झाल्या होत्या.त्याचा अनेकांशी संपर्क आला होता. परिणामी, कारवार जिल्हा प्रशासनासह त्याच्या संपर्कात आलेल्यांचे धाबे दणाणले होते. काल त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आल्यानंतर कट्टे काडपोळ गावातील 24 जणांना क्वारंटाईन करण्यासह अनेकांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. आता मात्र सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. प्रयोगशाळेतील नोंदणीमुळे ही गफलत झाली असण्याची शक्यता गोवा राज्य सरकार आणि कारवार जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT