Good News: Discharge to Second Corona Patient at Ahmednagar 
पश्चिम महाराष्ट्र

VIDEO: गुड न्यूज ः अहमदनगरचा दुसरा कोरोनाबाधितही परतला घरी, डॉक्टरांचे प्रयत्न फळाला

सकाळ वृत्तसेवा

नगर ः जिल्हावासीयांसाठी खूशखबर! जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेला पहिला रुग्ण काही दिवसांपूर्वी बरा होऊन घरी गेल्यानंतर आज कोरोनाबाधित दुसरा रुग्णही पूर्णपणे बरा झाला आहे. त्याचा तपासणी अहवाल आज "निगेटिव्ह' आला आहे. आज एकूण ३७ अहवाल निगेटीव्ह आले. त्या या बाधित रूग्णाच्या अहवालाचाही समावेश होता.

नेवासे तालुक्‍यातील असलेल्या या रुग्णाच्या स्रावाचा अंतिम नमुना आता तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात होता. तोही अहवाल "निगेटिव्ह' आल्यानंतर त्या रूग्णाला घरी सोडण्यात आले. त्यामुळे पहिल्यापाठोपाठ दुसरा रुग्णाला "डिस्चार्ज' मिळाला.

कोरोनाबाधित रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याचे स्पष्ट झाल्याने आरोग्य यंत्रणेनेही समाधान व्यक्त केले आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरासह जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर धोका वाढला असला, तरी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात आले.

गुरुवारी एकाच दिवसात कोरोनाबाधितांची संख्या नऊने वाढली. त्यामुळे जिल्ह्यातील आकडा 17वर पोचला आहे. मात्र, एक रुग्ण बरा होऊन घरी गेल्याने प्रत्यक्षात ही संख्या 16 आहे. त्यातीलही एक रुग्ण बरा झाला असून, त्याला "डिस्चार्ज' दिल्यानंतर ही संख्या 15वर आली आहे. 

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार विदेशी नागरिकांमुळे मोठ्या प्रमाणात झाल्याने, त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले जात आहे. 

489 व्यक्तींची तपासणी 
17 पॉझिटिव्ह 
419 निगेटिव्ह 
01 अहवाल येणे बाकी 
429 होम क्वारंटाईन 
166 देखरेखीखाली 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT