सांगली- जिल्ह्यातील दूध व्यवसायिक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच दूध व्यावसायिकांच्या समस्या शासन दरबारी पोहचविण्यासाठी सांगली-मिरज-कुपवाड दुध संघटनेची स्थापना केली असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व आष्टा येथील जे.डी.थोटे डेअरीचे मालक शितल थोटे यांनी दिली.
शितल थोटे म्हणाले, ""दुग्ध व्यवसायात सुयोग्य तंत्रज्ञान निर्मिती आणि विस्तार, चांगल्या योजना, चांगल्या गुणप्रतीची दूध निर्मिती आणि वितरण यांसारख्या उणिवा आहेत. तसेच मजुरांची उपलब्धता, चाऱ्याचा अभाव, भांडवलाची उपलब्धता, दुधाचा दर याबरोबरच समाजाचा या व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन या समस्यांना तोंड देत या व्यवसायाला पुढे घेऊन जाणे गरजेचे आहे. त्यामुळे सांगली-मिरज-कुपवाड दुध संघटनेची स्थापना केली आहे.''
संघटनेच्या उपाध्यक्षपदी दडगे दुग्धालयाचे चेतन दडगे यांची तर सेक्रेटरी पदी बोरकर डेअरीचे अनिश बोरकर यांची निवड करण्यात आली आहे. दुध संघटनेच्या सदस्यपदी सांगली येथील मधुसूदन डेअरीचे मनोहर कुलकर्णी, मिरज येथील विटा डेअरीचे चंदू कुलकर्णी, रामविश्वास डेअरीचे प्रसाद गवळी, सुरभी डेअरीचे माने, भिलवडी येथील पाटील डेअरीचे पाटील यांच्यासह सांगली जिल्ह्यातील विविध दूध डेअरीच्या मालकांची निवड करण्यात आली आहे.
सांगली-मिरज-कुपवाड दूध संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील दूध व्यवसायिकांना या व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञान पोहचविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबर दूध व्यवसायिकांना व्यवसाय वाढीसाठी मार्गदर्शनही केले जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष शितल थोटे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.