This is good news for Kopargaonkar 
पश्चिम महाराष्ट्र

कोपरगावकरांसाठी ही आहे गुड न्यूज

सकाळ वृत्तसेवा

कोपरगाव : कोणतीही करवाढ न करता, 2020-21 या आर्थिक वर्षाचे 53 लाख 74 हजार 799 रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक आज पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आले. 


नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पालिकेची अर्थसंकल्पी सभा झाली. आरंभीच्या शिलकीसह पालिकेचा संकलित कर, मालमत्ता व उपयोगिता सेवा, अनुदाने व अन्य बाबी, भांडवली जमा, विकास योजना, अनुदाने व कर्ज, असे एकूण 118 कोटी 59 लाख 8 हजार 273 रुपये उत्पन्न गृहीत धरण्यात आले. त्यातून कर्मचारी वेतन, सेवानिवृत्ती वेतन, सार्वजनिक सुरक्षा, शिक्षणसह अन्य विभागांचा महसुली खर्च व भांडवली कामासाठी 118 कोटी 5 लाख 33 हजार 473 रुपये खर्च येणार आहे. त्यातून 53 लाख 74 हजार 799 रुपये शिल्लक राहणार आहेत.

पालिकेने कर्जाची वेळेत परतफेड न केल्याने, कर्ज रकमेपेक्षा शासनाचे व्याज व दंडात्मक व्याजाची रक्कम जास्त होत आहे. 1970पासून विविध पाणीपुरवठा योजनांसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड अजून सुरू आहे.

पालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारी संकुलातील गाळेविक्री, मुदत संपलेले गाळ्यांचे नवे भाडे, अनामत घेऊन लिलाव करणे, पार्किंग ठेकेदारीवर देणे, व्यापारी संकुलातील पार्किंगसाठी मासिक दर आकारणे, जाहिरात करपद्धतीत सुधारणा करून वार्षिक भाडे आकारणे, बांधकाम साहित्यावर भाडे व अनामत रक्कम आकारण्यावर चर्चा झाली. 

विविध योजना व भांडवली पायाभूत खर्चासाठी साडेसहा कोटी, पर्यटन व तीर्थक्षेत्र विकासासाठी 35 कोटी 50 लाख, वैशिष्ट्यपूर्ण योजनेसाठी 4 कोटी, बंदिस्त नाट्यगृह बांधकामासाठी दीड कोटी, कार्यालयीन इमारतीसाठी 8 कोटी, उद्यान बांधकामासाठी दोन कोटी 85 लाख, अमरधामसाठी 60 कोटी 50 लाख, रस्त्यासाठी 2 कोटी 75 लाख, व्यापारी संकुल बांधकामासाठी एक कोटी, सुवर्णजयंती नगरोत्थानासाठी 3 कोटी, ठक्कर बाप्पा योजनेसाठी 10 कोटी, बंदिस्त गटार व पुनर्प्रक्रियेसाठी 4 कोटींचा तरतूद करण्यात आली. नागरिकांना विविध सेवा पुरविण्यासाठी 7 कोटी 74 लाख 92 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT