Good news ... there will be a special bus for women on this route
Good news ... there will be a special bus for women on this route 
पश्चिम महाराष्ट्र

खूशखबर... या रूटवर धावेल महिलांसाठी खास बस 

दौलत झावरे

नगर : महिलांची प्रवासात कुचंबणा होते, याच्या अनेक तक्रारी होतात. त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळाने खास महिलांसाठीच व महिला वाहक असलेली बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर नगर-पुणे व पुणे-नगर या मार्गावर ही बस धावेल. एसटीची स्थापना झाल्यानंतर प्रथमच या मार्गाने पहिली बस धावली होती. त्याच मार्गावर हा दुसरा क्रांतिकारी प्रयोग होत आहे. 

दिल्लीतील निर्भया प्रकरणामुळे महिलांच्या प्रवासातील सुरक्षेबाबत प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात होते. अहमदनगर शहर व जिल्ह्यातील नोकरी, व्यवसायानिमित्त अनेक जण पुण्यात स्थायिक आहेत. त्यात महिला-मुलींची संख्या लक्षणीय आहे.

त्यांच्यासाठी ही खूशखबर

आठवडा व पंधरा दिवसांतून एकदा ते गावी येतात. काही दररोजच ये-जा करीत असतात. त्यांचे प्रवासादरम्यान त्यांचे कायमच हाल होतात. त्यांना बसून द्यायला जेव्हा घरातील मंडळी येतात, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर ते सुखरूप पोचेपर्यंतची काळजी दिसून येत असते. त्यांच्यासाठी ही खूशखबर आहे. 

बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू

नगर विभागाचे विभागनियंत्रक विजय गिते यांनी ही काळजी ओळखून महिलांसाठी खास बस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बस दर सोमवारी सकाळी सहा वाजता नगरहून पुण्यासाठी, तर पुण्याहून नगरसाठी आठवड्यातील दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजता सुटणार आहे. ही बस प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत आहे. तिला प्रतिसाद मिळाल्यास आगामी काळात खास महिलांसाठी नगर-पुणे बस सोडण्याचा प्रयत्न अहमदनगर विभागातर्फे करण्यात येणार आहे. 

सोमवारचा मुहूर्त 
महिलांसाठीच स्वतंत्र असलेली व महिला वाहक असलेली राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस सोमवारी (ता. 25) सकाळी सहा वाजल्यापासून नगर-पुणे मार्गावर धावणार आहे. एसटीची सुरवातही पहिली नगरमधूनच राज्य परिवहन महामंडळाच्या नगर-पुणे या पहिल्या बसने झाली होती.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT