Good News: Third Corona Positive Discharge on the Way
Good News: Third Corona Positive Discharge on the Way 
पश्चिम महाराष्ट्र

गुड न्यूज ः वेलडन डॉक्टर... तिसरा कोरोना पॉझिटिव्हही डिस्चार्जच्या वाटेवर

सकाळ वृत्तसेवा

नगर -  मुंबई-पुण्यानंतर राज्यात नगरमध्येच सर्वाधिक रूग्ण आहेत. त्यामुळे सर्वांच्याच उरात धडकी भरली आहे. मात्र, एक गोष्ट इथे सातत्याने घडते आहे. आणि त्याला जिल्हा प्रशासन व वैद्यकीय यंत्रणेचे हे यश आहे. पुण्या-मुंबईच्या डॉक्टरांना जे जमले नाही ते नगरकरांनी करून दाखवलं आहे. त्यांची काळजी घेतल्याने आतापर्यंत एकाही रूग्णाला जीव गमवावा लागला नाही.

तिसऱ्या कोरोना बाधित रुग्णाचा १४ दिवसानंतरचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यामुळे दिलासादायक घटना घडली आहे. मात्र, अजून एका अहवालाची प्रतीक्षा आहे. तो निगेटीव्ह आल्यास उद्या घरी सोडणार येणार आहे.

आतापर्यंत जिल्ह्यात २५जणांना बाधा झाली आहे. त्यातील दोघांना ठणठणीत बरे करून घरी सोडले आहे. आता तिसरा रूग्ण ही डिस्चार्जच्या वाटेवर आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयाने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे  आतापर्यंत १२२ व्यक्तींचे घशातील स्त्राव नमुने पाठविले आहेत. या अहवालाची प्रतीक्षा आहेत. यामध्ये तिसऱ्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या १४ दिवसानंतरच्या दुसऱ्या अहवालाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.

पहिले दोन रूग्ण दुबईहून आले होते. हा तिसरा रूग्ण नेमका कोणाच्या संपर्कात आले हेच कळले नव्हते. तरीही त्याला बाधा झाली होती. आता तोही बरा होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे नगरकरांचे बरेच टेन्शन हलके झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tech Layoffs : यंदाचं वर्ष ठरतंय 'लेऑफ'चं.. एप्रिलपर्यंत टॉप टेक कंपन्यांनी 70,000 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना पाठवलं घरी!

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Mumbai Loksabha: वर्षा गायकवाडांना निवडणूक जाणार कठीण? या कारणामुळे नसीम खान नाराज

Goldy Brar: गोल्डी ब्रार जिवंत! कॅलिफोर्नियात मारलेली व्यक्ती दुसरीच; अमेरिकन पोलिसांचा खुलासा

Latest Marathi News Live Update : 11 दिवसानंतर मतदानाची आकडेवारी कशी आली; संजय राऊतांचा आरोप

SCROLL FOR NEXT