untitled.png
untitled.png 
पश्चिम महाराष्ट्र

आनंदाची बातमी ः विटा  बनले कचरामुक्त शहर 

सकाळवृत्तसेवा

विटा (सांगली) ः विटा नगरपालिकेने राबवलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील वैविध्यपूर्ण व सातत्यपूर्ण उपक्रमांमुळे विटा शहरास "कचरा मुक्त शहर म्हणून 3 स्टार मानांकन देऊन केंद्रशासनाकडून गौरव करण्यात आला. विटा शहरास हे यश मिळाल्याबद्दल स्वच्छता अभियानचे ब्रॅंड अँबेसिडर वैभव पाटील यांनी नगरपालिकेचे अधिकारी पदाधिकारी कर्मचारी यांचेसह नागरिकांचे अभिनंदन केले. 

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत संपूर्ण विटा शहरातून शंभर टक्के कचरा संकलन यामध्ये ओला सुका व घातक यापद्धतीने वर्गीकृत कचरा संकलन केला जात होता. कचऱ्यापासून बायोचार कंपोस्टिंग खत ते वीज निर्मिती असा नाविन्यपूर्ण प्रयोग विटा शहरांमध्ये राबवण्यात आला होता.शंभर टक्के संकलन घंटागाडीच्या माध्यमातून घनकचरा व्यवस्थापन भूमी येथे शास्त्रोक्त पद्धतीने संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. 

मुख्याधिकारी अतुल पाटील म्हणाले," नगरपालिकेच्या वतीने जनजागृती विशेष टीमच्या माध्यमातून व नगरपरिषद सर्व कर्मचारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून संपूर्ण विटा शहरामध्ये स्वच्छतेची लोकचळवळ उभा केली.यामध्ये 100 टक्के सिंगल युज प्लास्टिक बंदी करण्यात आली.सार्वजनिक ठिकाणे,कचरा पडणारी ठिकाणे सुशोभित करण्यात आली आहेत." 

"तलाव स्वच्छता करुन गटरावर जाळी बसवणे,शहरांमध्ये असलेल्या सर्व मोठ्या जुन्या स्टोरीज बिन काढून ट्‌वीन बीन लावण्यात आलेल्या आहेत.विटेकर नागरिकांनी घरीच सेंद्रिय खत तयार करावे,यासाठी प्रोत्साहन देऊन होम कंपोस्टिंग हा उपक्रम राबवला.सोलर टवीन हा देशातील पहिला प्रयोग प्रकल्प विटा नगरपरिषदेने राबवला. शंभर टक्के कचऱ्यावर प्रक्रिया या पद्धतीचे कामकाज

विटा पालिकेने राबवले, विटा शहरातील रहिवासी भागांमध्ये एक वेळ तर व्यापारी भागांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळी संपूर्ण साफसफाई नित्य सुरु असते.विटेकर नागरिकांचे योगदान फार महत्त्वाचे आहे यामुळे स्वच्छतेत विटा नगर परिषद चांगली कामगीरी करु शकली असे मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले. माजी आमदार सदाशिवराव पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष अजित गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पाटील आदींचे मार्गदर्शन लाभले. 
----------------------- 

कचरामुक्त विटा शहरात 3 तारांकित मानांकन मिळाले यानिमित्ताने यासाठी कष्ट घेतलेल्या सर्वांचं विशेषतः नगरपरिषद सर्व पदाधिकारी कर्मचारी आणि संपूर्ण विटा शहर अभिनंदन करुन या पुढे सातत्याने आपण स्वच्छतेसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन अँड. पाटील यांनी केले. 

प्रतिभा वैभव पाटील 
नगराध्यक्षा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT