पश्चिम महाराष्ट्र

नरेंद्र मोदी गो बॅकचा धनगर समाजाचा नारा

सकाळवृत्तसेवा

सांगली - धनगर समाजाच्या आरक्षणासाठी समाजाने आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. धनगर समाजाला एसटीचे दाखले हातात द्या या मागणीसाठी नरेंद्र मोदी गो बॅकचा नारा देऊन आंदोलन सुरू करण्याचा इशारा समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे. धनगर समाजाची अगोदर वचनपूर्ती करा आणि मगच महाराष्ट्रात या, असेही पडळकर यांनीे सागितले.

श्री. पडळकर म्हणाले, उद्या सोलापूर येथे पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. या सभेवर धनगर समाजाने बहिष्कार घालण्याचा निर्धार घेतला आहे. तसेच मोदींच्या एकाही सभेला कोणी जाऊ नये अशी हाकही पडळकर यांनी धनगर समाज बांधवाना दिली आहे.

महाराष्ट्रात मोदींच्या सभे दरम्यान लोकशाही पध्दतीने आंदोलन करणार असल्याचे पडळकर यांनी यावेळी सांगितले. तसेच उद्या सोलापूरमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाचे नेते पडळकर यांनी आंदोलनाची भूमिका जाहीर केल्याने खळबळ माजली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : पुणे विद्यापीठाकडून नवीन महाविद्यालये व अभ्यासक्रमांसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

US H-1B Visa: भारतीयांनो जर्मनीत कामाला या! पगारही वाढणार; अमेरिकेतील व्हिसा धोरणाच्या पार्श्वभूमीवर घेतला मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : कांदिवलीत भीषण आग, सात जण गंभीर जखमी

Wet Drought Explaind: 'ओला दुष्काळ' अशी संकल्पनाच नाही, मग राजकारणी का मागणी करतात? सरकारी भाषेत व्याख्या काय?

Pune News: सलग दुसऱ्या दिवशी आंदेकर टोळीवर कारवाईचा बडगा, पोलिसांचा मोठा फौजफाटा | Sakal News

SCROLL FOR NEXT