पश्चिम महाराष्ट्र

पडळकर म्हणाले, लोकांची भावना पाहून घेतला निर्णय...

सकाळ वृत्तसेवा

सांगली - ""आयुष्यात पुन्हा भाजपला मत द्यालं तर बिरोबाची शपथ आहे, असे जाहीर आवाहन करणारे वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर उद्या (ता. 30) मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. राज्यातील एकूण परिस्थिती आणि लोकांची भावना पाहून मी हा निर्णय घेतला आहे,'' असे त्यांनी "सकाळ'शी बोलताना स्पष्ट केले. 

गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार संजयकाका पाटील यांच्याशी टोकाचा संघर्ष, टोकाची टीका, तीव्र शब्दांत हल्ला करणारे पडळकर भाजपमध्ये आल्यानंतर संजयकाकांशी पटेल का? असा प्रश्‍न लोकांना पडला आहे. त्याबाबत श्री. पडळकर यांनाच विचारले असता, ते म्हणाले, ""पटेल की, नाही पटायला काय झालं?'' पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीची सांगलीची उमेदवारी घेतली होती. त्यांना अतिशय ताकदीने लढत देत तब्बल 3 लाखांवर मते घेतली. त्यांनी भाजप सोडली, लोकसभा लढले, पराभूत झाले आणि आता परत ते भाजपमध्ये येत आहेत. कुणाशी बोलून हा निर्णय झाला, या प्रश्‍नावर गोपीचंद म्हणाले, ""थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे.''

विधानसभेच्या मैदानात असणार का, या प्रश्‍नावर ते म्हणाले, ""अजून काही ठरलेले नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती स्वीकारून काम करणार आहे.'' 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Apology Farmers : संजय राऊतांनी शेतकऱ्यांची माफी मागितली! मंत्री दादा भुसेंनी मालेगाव न्यायालयातील खटला घेतला मागे, दोघांची पत्रकार परिषद

Risky Apps : गुगलची डिजिटल स्ट्राइक! प्ले स्टोअरवरून ब्लॉक केले 'हे' विषारी अ‍ॅप्स; जर तुमच्या मोबाईलमध्ये असतील तर, लगेच करा डिलीट

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस भरतीवेळी सांगलीच्या तरुणाचा मृत्यू

Kalyan ACP Office Snake : साडेपाच फुटांचा अतिविषारी नाग शिरला कल्याणच्या ACP कार्यालयात; महिला पोलिसांनी स्वतःला खोलीत घेतलं कोंडून, पुढे काय झालं?

Trimbakeshwar News : त्र्यंबकेश्वरमध्ये संतापाचा वणवा! कुंभमेळा भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा देत रचले 'सरण'

SCROLL FOR NEXT