पश्चिम महाराष्ट्र

'सरकारला मराठा, धनगर आरक्षण द्यायचेच नाही'

आमदार गोपीचंद पडळकर : एमपीएसीच्या विद्यार्थ्यांना तातडीने नियुक्‍त्या द्या

सकाळ वृत्तसेवा

सांगली : मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे (state government) सरकारने सर्वोच न्यायालयात (suprime court) गायकवाड (gaikwad commisson) आयोगाची पाठराखण केली नाही. महाविकास आघाडी सरकारला मराठा आणि धनगर आरक्षण (maratha and dhanagar reservation) द्यायचेच नाही असेच दिसत आहे. आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडल्या गेलेल्या 76 विद्यार्थ्यांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. इतर सर्व मागासवर्गीय, एनटी, एसटी, एससी प्रवर्गातील (sc,nt,st) 365 युवकांना अजून नियुक्ती नाही. त्यांना तातडीने नियुक्‍त्या द्या अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

आमदार गोपीचंद पडळकर (gopichand padalakr) पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे (uddhav thakrey) यांनी ज्या तातडीने आदित्य ठाकरे यांची मंत्रिपदी वर्णी लावली त्या तातडीने बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी एमपीएसीतून (MPSC exam) निवडले गेलेल्या विद्यार्थ्यांना नियुक्‍ती द्यावी. त्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. आमदार पडळकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लिहीलेल्या पत्रात ही मागणी केली आहे. मराठा आरक्षण रद्द झाले ही वेदनादायी गोष्ट असून त्यासाठी महाविकास आघाडी जबाबदार आहे. पण मराठा समाजाबरोबरच इतर भटक्‍या, मागासवर्गीय, अनुसुचित जाती व जमातींमधील युवकांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे. याचा उद्रेक झाल्यास ते महाविकास आघाडी सरकारचे पाप ठरेल, असे ते म्हणाले.

पंढरपूरच्या जनतेने सरकारला औकात दाखवून दिली : पडळकर

विश्वासघाताने सत्तेत आलेल्या सरकारला पंढरपूरमध्ये लोकांचा विश्वास जिंकता आला नाही. पंढरपूरच्या जनतेनं त्यांची औकात दाखवून दिली आहे. अजित पवारांच्या मुखातील "मायचा लाल" समाधान औताडे ठरला असून सव्वा वर्षात सरकारला आलेले अपयशाची नाराजी जनतेने दाखवली असल्याची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs WI : संजू सॅमसनची ९७ धावांची मॅच विनिंग खेळी! भारत ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरीत; आता इंग्लंडला भिडणार

BMC Property Tax: मुंबईकरांना दिलासा!मालमत्ता करात मोठा बदल; ७०० स्क्वेअर फूट घरांना फायदा, बीएमसीचा महत्त्वाचा निर्णय

Paithan Crime: अपहृत विद्यार्थिनीची सुटका, शिक्षकास बेड्या; पैठण पोलिसांची मुंबईत कारवाई, लोकेशन बदलून देत होता हुलकावणी!

महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ होणार! राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचा प्लॅन ठरला; अमित शाहांनी रवींद्र चव्हाणांना काय सांगितलं?

Solapur Crime: छत्रपती शिवाजी महाराजांचा बेकायदा पुतळा बसवल्याप्रकरणी अंकोलीच्या अकरा जणांवर गुन्हा; शासकीय नियमांचे उल्लंघन!

SCROLL FOR NEXT