anudan.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

गोटखिंडी चुकीच्या कर्जमाफीबद्दल गुन्हे दाखल करा, पालकमंत्र्यांचे आदेश

सकाळवृत्तसेवा


सांगली ः गोटखिंडी ( ता. वाळवा) येथील राज्य शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत चुकीच्या माहिती आधारे कर्जमाफी मिळवल्याबद्दल सात कर्जदार, सबंधित सोसायटीचा सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज जिल्हाधिकारी यांना दिले. जिल्ह्यातील कर्जमाफीच्या याद्यांचा आढावा घ्यावा, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले. 

पालकमंत्री जयंत पाटील यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. त्यावेळी गोटखिंडी येथील कर्जमाफी प्रकरणाबाबत पालकमंत्री श्री. पाटील यांना विचारले असता त्यांनी सबंधित बनावट कर्जदार तसेच जबाबदार सोसायटी सचिव यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गोटखिंडी येथे 16 लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप झाल्यानंतर याबाबत जिल्हा सहकार उपनिबंधक नीळकंठ करे यांची चौकशी समिती नेमली होती. त्याचा अहवाल आज जिल्हा प्रशासनाला मिळाला. सबंधित अहवालावर चर्चा झाल्याचे पालकमंत्री श्री. पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. 

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले,"" गोटखिंडी सोसायटीत सात-बारा नावावर नसताना बनावट पध्दतीने कर्जमाफी केली आहे. अन्य काही शेतकऱ्यांना कर्जमाफी देतानाही ती चुकीच्या पध्दतीने किंवा त्यांनी घेतलेल्या कर्जापेक्षा अधिक रक्कम दिलेली आहे. याबाबत चौकशी समितीचा अहवाल आज जिल्हा प्रशासनाला मिळाला आहे. सबंधित लाभार्थीसह जबाबदार सोसायटी सचिव यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अशा घटना झाल्या असतील, अशी शक्‍यता गृहीत धरुन याद्यांची तपासणीही करण्यास सांगितले आहे.' 
...... 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT