corona.jpg
corona.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

खासगी रुग्णालये, व्यावसायिकांना शासनाचे विमा संरक्षण लागू 

विष्णू मोहिते


सांगली, ः कोरोनाचे संकट मोठे आहे. या साथीच्या नियंत्रणासाठी समाजाला गरज आहे. शासनाला सकारात्मक प्रतिसाद द्या, या जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केलेल्या आवाहनाला खासगी वैद्यकीय व्यवसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या रुग्णालयात उपचार सेवा बजावणाऱ्यांना डॉक्‍टरांना संबंधित रुग्णालये, संरक्षण सामग्री उपलब्ध करुन देणार आहेत. शासनाने दिलेले विमा संरक्षण लागू राहिल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. 


जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शासकीय रुग्णालयांसोबत आवश्‍यकतेनुसार महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सूचीबध्द असलेली रुग्णालये, बॉंम्बे नर्सिंग ऍक्‍ट खाली नोंदणीकृत खासगी रुग्णालये कोरोना उपचारासाठी अधिग्रहित करण्यात येत आहेत. आतापर्यंत वॉन्लेस हॉस्पीटल (मिरज), घाटगे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल (सांगली), विवेकानंद हॉस्पीटल (बामणोली), सेवासदन हॉस्पिटल (मिरज), मेहता हॉस्पिटल टिंबर एरिया (सांगली), कुल्लोळी हॉस्पिटल विश्रामबाग (सांगली) ही रुग्णालये अधिग्रहित करण्यात आली आहेत. या ठिकाणी या रुग्णालयांच्या पॅनेलवरील वैद्यकीय व्यावसायिक व अन्य कर्मचाऱ्यांच्या बरोबरच खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा अधिग्रहित रुग्णालयांत उपलब्ध करुन देण्याचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी संवाद साधण्यासाठी नियोजन सभागृहात बैठक घेतली. खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी प्रशासनाच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला. महानगरपालिकेचे आयुक्त नितिन कापडणीस, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती. या रुग्णालयात उपचार सेवा बजावणाऱ्यांना डॉक्‍टरांना संबंधित रुग्णालये, संरक्षण सामग्री उपलब्ध करुन देणार आहेत. शासनाने दिलेले विमा संरक्षण लागू राहिल. सेवा बजावताना एकाद्याला प्रादुर्भाव झाल्यास त्यांना उत्कृष्ट दर्जाची उपचाराची सुविधा देण्यात येईल, असेही सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT