Teacher sakal
पश्चिम महाराष्ट्र

बेळगाव : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालये अतिथी प्राध्यापकांवरच अवलंबून

बेळगाव शैक्षणिक जिल्हात 221 जागा रिक्त

मिलिंद देसाई

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील (Karnataka)13 जिल्ह्यांमध्ये सरकारी माध्यमिक आणि पदवीपूर्व महाविद्यालये अतिथी प्राध्यापकांवर (guest professor)अवलंबून आहेत. त्यामुळे सरकारी माध्यमिक व पदवीपूर्व महाविद्यालयामध्ये तातडीने शिक्षक व प्राध्यापकांच्या कायमस्वरूपी जागा भरणे गरजेचे आहे. सध्या बेळगाव (Belgaum)शैक्षणिक जिल्ह्यातील 130 माध्यमिक शाळांमध्ये 221 तर चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यामध्ये 414 जागा रिक्त आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी महाविद्यालयांमध्ये शिक्षक व प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. या जागांवर कायमस्वरूपी शिक्षक भरती होईल या आशेने गेल्या अनेक वर्षांपासून अतिथी प्राध्यापक काम करीत आहेत. मात्र सातत्याने मागणी करूनही कायमस्वरूपी जागा भरती केल्या जात नसल्याने अतिथी प्राध्यापक सध्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अतिथी प्राध्यापकांच्या आंदोलनामुळे महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारी प्राथमिक शाळांप्रमाणेच सरकारी माध्यमिक शाळा व पदवी पूर्व महाविद्यालयात देखील शिक्षक व प्राध्यापकांच्या जागा भरती कराव्यात अशी मागणी होऊ लागली आहे.

जिल्हा-माध्यमिक शाळा-मंजूर जागा-रिक्त जागा

  • बागलकोट-186-1736-267

  • बल्लारी-230-2028-470

  • बेळगाव-130-1170-221

  • चिक्कोडी-186-1735-414

  • बिदर-167-1533-262

  • धारवाड-108-923-174

  • गदग-113-933-174

  • हावेरी-141-1170-134

  • गुलबर्गा-293-2403-308

  • कोप्पळ-161-1410-301

  • रायचूर-219-2040-423

  • विजापूर-153-1346-232

  • यादगिरी-122-1071-205

  • एकूण-2209-19495-3550

उत्तर कर्नाटकातील 13 जिल्ह्यांमध्ये 2209 सरकारी माध्यमिक शाळा आहेत यापैकी 2174 शाळा स्वतःच्या इमारतीमध्ये आहेत. तर स्वतःची इमारत नसलेल्या 35 शाळांपैकी 28 शाळा भाडोत्री इमारतीत आहेत. 2 शाळांच्या इमारतीचे काम सुरू आहे. तर 5 शाळांना इमारतीची आवश्यकता आहे 13 जिल्ह्यांमध्ये 431 पदवीपूर्व महाविद्यालये असून सर्व महाविद्यालयांना स्वतःची इमारत आहे. (Belgaum News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT