gram panchayat candidate suicide case in belgaum 
पश्चिम महाराष्ट्र

मृत्यूपत्र लिहून ग्रामपंचायत उमेदवाराने केली आत्महत्या

महेश काशीद

धारवाड (बेळगाव) : ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने आत्महत्या केल्याची घटना आज (ता.22) उघडकीस आली. दामोदर यलीगार (वय 25) असे त्याचे नाव असून, राहत्या घरीच गळपास घेऊन जीवन संपविले आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी मृत्यू पत्र लिहिले असून, पोलिसांनी ते जप्त केले आहे. 


ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज (ता.22) मतदान आहे. यासाठी सर्वत्र उमेदवार जोर लावत असताना दामोदर यांनी जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे. दामोदर हे धारवाड जिल्ह्यात गरग ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणूक लढवीत होते. तसेच काही दिवसांपासून समर्थक आणि मित्रांना घेऊन निवडणूक प्रचारासाठी जोर लावलेला होता. परंतु, आज मतदानादिवशी त्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

आत्महत्येपूर्वी त्यांनी मृत्यूपत्र लिहिले आहे. पोलिसांनी पत्र जप्त केले असून, चौकशी सुरु केली आहे. गरग पोलिस ठाण्यात याची नोंद आहे. 

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT