Grape pruning speed in Tasgaon West
Grape pruning speed in Tasgaon West 
पश्चिम महाराष्ट्र

तासगाव पश्‍चिममध्ये द्राक्ष खरडछाटणी गतीने 

रवींद्र माने

येळावी : तासगाव पश्‍चिम भागात येळावी, निमणी व तुरची परिसरात द्राक्षांच्या खरड छाटणीचे काम गतीने सुरु आहे. एकाच वेळी अनेक बागांत छाटणी होत असल्यामुळे मजुरांची धावाधाव होत आहे. तासगाव पश्‍चिमसह निमणी, तुरची, नेहरूनगर, येळावी व नागाव परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. दरवर्षी या परिसरातून दरवर्षी निर्यातक्षम द्राक्षे पिकवली जातात. 

यावर्षी सुरुवातीच्या आगाप हंगामात काही बागायतदारांना चांगला दर मिळाला. अंतिम टप्प्यात झालेल्या कोरोनाच्या संचारबंदीमुळे द्राक्ष दर अतिशय कमी मिळाला. काही बागायतदारांनी निर्यातक्षम द्राक्षापासून बेदाणा तयार करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परिणामी बागायातदारांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाल्याने तो संकटात सापडला आहे. 

आगामी काळात चांगल्या प्रतीची निर्यातक्षम द्राक्षे तयार करण्याच्या उद्देशाने एप्रिलमध्येच खरड छाटणी होणे आवश्‍यक असते. या महिन्यातच खरड छाटणी घेतल्यास झाडांना जास्त काळ विसावा मिळतो. आगाप फळछाटणीला वाव मिळतो. ही फळ छाटणी घेतल्याने द्राक्षे बाजारात लवकर उपलब्ध होऊन दर चांगला मिळतो. या कारणामुळे सर्व बागायतदार एप्रिलमध्येच खरड छाटणी घेत असल्याचे दिसते. 

खरड छाटणीचे काम येळावी, निमणी, नागाव, तुरची व नेहरूनगर परिसरात जोरात सुरू आहे. एका झाडाच्या दोन्ही बाजूकडील पाला काढण्यासाठी प्रती झाड साडेतीन रूपये मजूरांना मिळतात. एकीकडे ऐन उन्हाळ्यात कोरोना काळात मजुरांना काम, पैसा व वैरण मिळत असल्याने मजुरांत समाधानाचे वातावरण आहे. 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT