The grape season in Kawathamahankal taluka has begun
The grape season in Kawathamahankal taluka has begun 
पश्चिम महाराष्ट्र

'या' दृष्काळग्रस्त ठिकाणची द्राक्ष झाली गोड...

सकाळ वृत्तसेवा

सांगली - कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर द्राक्ष हंगाम सुरू झाला आहे. बेदाणा प्रक्रिया निर्मितीसाठी शेडही सज्ज झाले आहेत. चालू वर्षी सततचा दुष्काळ, बदलत्या हवामानाचा फटका, अवकाळी पाऊस, लष्करी आळीचे द्राक्ष पिकावर आक्रमण अशा अनेक समस्या पाठीवर टाकत द्राक्ष हंगाम सुरू झाला. शेतकऱ्यांची बागा घालवण्यासाठी धावपळ सध्या सुरू झाली आहे.

बेदाणा प्रक्रियाचे शेडही झाले तयार

यंदाच्या हंगामात अर्थातच द्राक्ष व बेदाणा उत्पादन घटणार आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना चालू वर्षी द्राक्षाचा दर्जाही चांगला आला नाही. द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. महागडी औषधे, खते, मजुरी यावरील वारेमाप खर्च वजा जाता यावर्षी हाती काय पडेल का या गर्तेत आहे. गेली तीन- चार वर्षे शेतकरी विकतचे पाणी घेऊन बागा जतन करत आहे. दुष्काळ पाचवीला पूजला असतानाही त्यावर मात करत या भागात द्राक्ष पीक क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले. ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने घातलेल्या धुमाकुळाने द्राक्ष शेतीला चांगलाच हादरा दिला. त्यापाठोपाठ अमेरिकन लष्करी आळीनेही द्राक्षावर चांगलेच आक्रमण केले. सधन शेतकऱ्यांनी बागा कशाबशा जतन केल्या, पण कुमकवत शेतकऱ्यांनी बागा आहे त्या स्थितीत सोडून दिल्या. ज्यांनी  बागा जतन केल्या ते शेतकरी आता चांगल्या दराची अपेक्षा करत आहेत.  सध्या आगाप पीक छाटणी घेतलेल्या बागा द्राक्ष विक्रीसाठी सज्ज झाल्या आहेत.

घाटमाथ्यावर परदेशी व्यापारीही दाखल 

परिसरात द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी, दलाल दाखल झाले असून अपेक्षेप्रमाणे ते रंगच आला नाही, गोड़ीच नाही, मालाच्या दर्जाविषयी शंका सांगून दर पाडून मागत आहेत. बळीराजाही हवामानाच्या लहरीपणाचा फटका सहन केल्याचा पूर्वानुभव असल्याने तेही व्यापारी मागतील त्या दरात माल  देत आहेत. तालुक्‍यात द्राक्ष शेतीला चांगले वातावरण असल्याने द्राक्ष शेतीही मोठ्या प्रमाणात वाढली. दुष्काळाने व गत वर्षाच्या अस्मानी संकटाने द्राक्ष उत्पादनाला चांगलाच फटका बसला.

बेदाण्यासाठी शेतकरी उत्सुक

दरम्यान, कवठेमहांकाळ तालुक्‍यातील मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर कुची ते जुनोनी दरम्यान बेदाणा निर्मितीसाठी हजारो शेड उभारले आहेत. बेदाणा निर्मितीसाठी पोषक वातावरण असल्याने येथील शेडचा  उपयोग संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी करतात. हिरव्या रंगाचा बेदाणा येथे  निर्माण केला जातो. त्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदी आज राम मंदिरात जाऊन घेणार रामलल्लाचे दर्शन

SCROLL FOR NEXT