The grape season needs a big lift; Exportable goods to the local market 
पश्चिम महाराष्ट्र

द्राक्ष हंगामाला मोठ्या उठावाची गरज; निर्यातक्षम माल स्थानिक बाजारात

विष्णू मोहिते

सांगली ः जिल्ह्यात द्राक्ष हंगामाने गती घेतली आहे. द्राक्षांची युरोपसह आखाती देशातील निर्यातक्षम धिम्या गतीने सुरु आहे. परिणामी निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारात विक्रीसाठी येण्याची भीती आहे. थंडी आणि कोरोनाचा द्राक्ष बाजारपेठेवर परिणाम अद्याप जाणवतोय. उत्पादक मोठ्या प्रमाणावर द्राक्षाच्या उठावाच्या प्रतिक्षेत आहेत.

चार दिवसांत जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम गतीने सुरु होईल. अद्यापही हव्या त्या प्रमाणात व्यापारी फिरकलेले नाहीत. निर्यातक्षम द्राक्षाचीही उचल कमीच आहे. सध्या आखाती देशात काहीसा उठाव सुरु झाला आहे. परिणामी निर्यातक्षम द्राक्ष स्थानिक बाजारात विक्रीस येऊन दरात घसरण होण्याची शक्‍यता आहे. अवकाळी व प्रतिकूल वातावरणाचा परिणाम निर्यातक्षम मालावर झाल्याचे स्पष्ट आहे. यंदा हंगामाच्या प्रारंभापासून पावसाचे विघ्न आले. एकाच वेळी 10 ते 20 ऑक्‍टोबर दरम्यान फळछाटणी झाल्याने द्राक्षाची काढणीलाही त्याच प्रमाणात गती येणार आहे. 

द्राक्ष बाजारपेठ... 

  • लंबगोल द्राक्षांला मागणी 
  • गोडी, रंग आणि टिकवण क्षमता 
  • युरोप, आखातात निर्यातीला ठंडा प्रतिसाद 
  • निर्यातक्षम उत्पादन 10 ते 15 टक्के 
  • बेदाणा निर्मिती- 20 टक्के 
  • देशांतर्गत विक्री- 70 टक्के 

सध्याचे दर...( किलोमध्ये ) 

  • काळी द्राक्षे- 100 ते 110 
  • पांढरी लंबगोल द्राक्षे- 50 ते 60 
  • पांढरी गोल द्राक्षे- 40 ते 50 

थंडी, कोरोनाचा परिणाम
द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी येत आहेत. थंडी, कोरोनाचा परिणाम अद्यापही बाजारावर आहे. निर्यातक्षम द्राक्षांचा स्थानिक बाजारपेठांवर परिणाम होत आहे. 

- सतिश जाधव, सोनी 

मोठ्या उठावाची प्रतीक्षा

ओमान, सौदी, दुबई येथे निर्यात होत आहे. मोठ्या उठावाची प्रतीक्षा आहे. दरवर्षीच्या तुलनेत व्यापारी कमी आले आहेत. 

- रंगराव जाधव, अध्यक्ष, द्राक्षायणी शेतकरी उत्पादक कंपनी

संपादन : युवराज यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी! उकाड्यानंतर पुन्हा पावसाची शक्यता; पुढील दोन ते तीन दिवसांचा अंदाज

Mumbai: 'लालबागचा राजा'च्या दर्शनाच्या नावाखाली ४ भाविकांना गंडा, बारावीतील विद्यार्थ्याला अटक

Patna Mother Murder : मुलानेच आईला जिवंत जाळलं; पोलिसांना म्हणाला- ‘मी देवाचा अवतार, कलियुग सुरूय, मीच तिला संपवलं'

Marathi News Live Updates : ममता बॅनर्जींची सर्वोच्च न्यायालयात धाव; TMC नाव आणि पारंपरिक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान

Badrinath Military Exhibition : बदरीनाथमध्ये मुख्यमंत्र्यांचा रायफल हातात घेत नेमबाजीचा सराव; लष्करी प्रदर्शनाची घेतली पाहणी

SCROLL FOR NEXT