Grapes turned black because of the ash coming out of the factory chimney 
पश्चिम महाराष्ट्र

कारखान्याच्या धुरांडीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे द्राक्ष काळवंडली 

निरंजन सुतार

आरग : केम्पवाड कारखान्याच्या धुरांडीतून बाहेर पडणाऱ्या राखेमुळे द्राक्ष बागांसह अन्य शेती, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, द्राक्ष बागायतदार संकटात सापडला आहे. राखेवर नियंत्रण मिळवण्यासाठी कारखान्याने प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवावी. अन्यथा अथणी शुगर कारखान्याचे अध्यक्ष श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील बंगल्यावर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला. 

लिंगनूर (ता. मिरज) येथील आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी नूतन सरपंच मारुती पाटील, जिल्हा उपाध्यक्ष भरत चौगुले, शाखाध्यक्ष नंदू नलवडे उपस्थित होते. श्री. खराडे म्हणाले,""केम्पवाड येथील अथणी शुगर कारखान्याची निर्मिती होऊन दहा ते पंधरा वर्षे झाली. मात्र कारखान्याच्या धुरांडीतून मोठ्याप्रमाणात राख बाहेर पडत असते. परिसरातील द्राक्ष घडांवर ही राख पडते त्यामुळे घड काळे पडतात, काळी पडलेली द्राक्षे मातीमोल किमतीने विकावी लागतात. यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लिंगनूर, खटाव, शिंदेवाडी, जानराव वाडी, संतोश वाडी आदी गावांतील दोन हजार एकरांतील शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. 

याशिवाय कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या मळीमुळे परिसरातील पाणीही दूषित झाले आहे. विहीर, कूपनलिका यांचे पाणी पिण्यालायक नाही ही वस्तुस्थिती आहे. मका, गवत आदी वैरणींचेही नुकसान होत आहे. यामुळे परिसरातील शेतकरी हैराण झाला आहे. या प्रश्नावरून कारखान्याचे अध्यक्ष मंत्री श्रीमंत पाटील यांना वारंवार लेखी निवेदने दिली आहेत, मात्र त्यांनी कानाडोळा केला आहे.
 
धुरांडीतून बाहेर पडणाऱ्या राखेचे पुढील हंगामापूर्वी नियोजन करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, ही प्रमुख मागणी आहे. अन्यथा कारखाना आणि श्रीमंत पाटील यांच्या सांगलीतील बंगल्यावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला.'' यावेळी प्रास्ताविक नंदू नलवडे यांनी केले. भरत चौगुले, मारुती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रावसाहेब बेडगे, राजाराम नाईक, दीपक मगदूम, अशोक मगदूम, चंद्रकांत नाईक, विजय विवेकी, व्हणाप्पा वर्णेकर, युवराज मगदूम आदींसह मोठ्यासंख्येने शेतकरी उपस्थित होते.


संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT