corona logo.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

आटपाडीकरांना मोठा दिलासा : तालुक्‍यातील इतके रूग्ण कोरोनामुक्त

सकाळवृत्तसेवा

आटपाडी (सांगली) -तालुक्यातील कोरोना बाधित पंधरा रुग्णांपैकी सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. ते कोरोनामुक्त झाले आहेत.त्यामुळे आटपाडीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.


18 मे रोजी दिल्लीहून आटपाडीत आलेला एक युवक कोरोना पॉझिटिव्ह आला. त्याला येथील खाजगी लॉजवर कोरोणईन केले होते. या घटनेने तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर दहा दिवसांत तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या पंधरावर पोहोचली. यामध्ये आटपाडीत तीन, सोनारसिद्ध नगरमध्ये तीन, कामत येथे दोन, बनपुरी दोन असे गावागावात रोज रुग्ण सापडत होते.


कोरोनामुक्त तालुक्यात कोरोणाने शिरकाव केल्यामुळे तालुका हादरून गेला होता.जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी, आमदार अनिल बाबर यांनी आढावा बैठक घेऊन कोरोनाची साखळी तोडण्यास संदर्भात काही सूचना केल्या.परिस्थिती काळजी करण्यासारखी होती. रोजच रुग्ण सापडत गेल्यामुळे पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागावर मोठा ताण पडला होता. या घटनेनंतर पोलीस प्रशासन आणि गावागावातील दक्षता समितीने अधिक गांभीर्याने घेऊन बाहेरून येणाऱ्यांना शक्तीने कोरणटाईण केले गेले. गेल्या सहा दिवसात करणाचे रुग्ण सापडले नव्हते. दरम्यान या काळामध्ये तालुक्‍यातील सहा रुग्ण कोरोणा मुक्त झाले आहेत.बाहेरून येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे.त्यामुळे आटपाडीकरांना दिलासा मिळाला आहे.


दरम्यान तासगाव आगारातील शेटफळे येथील चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.हा चालक परप्रांतीय मजुरांना सोडण्यासाठी छत्तीसगडला गेला होता. त्याला राहत्या घरीच कोरोणटाईन केले होते. त्याच्या कुटुंबातील सातजण आणि सोबत गेलेल्या गावातील एक चालक यांना प्रशासनाने तातडीने गावातून हलवून आटपाडीत शासकीय इमारतीमध्ये कोरोणटाइन केले. आज या सर्वांचे श्वाब घेऊन तपासणीसाठी मिरजेला पाठवण्याचा आरोग्य विभागाने निर्णय घेतला आहे.तसेच प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या अनेकांना शेटफळेत कोरोणटाईन केले आहे. याशिवाय पुणे होऊन शेटफळे आलेल्या एका महिलेला आणि वाक्षेवाडी येथे मुंबईहून आलेल्या एकाला प्राथमिक लक्षणे दिसू लागल्यामुळे तपासणीसाठी तातडीने पाठवले आहे. त्यांच्या तपासणी अहवालाकडे लक्ष लागले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Rest House: बेड, फ्रिज, आरओ अन्... भारतीय रेल्वेची मोठी भेट; आधुनिक विश्रामगृह सुरू

'धुरंधर'च्या यशामध्ये खऱ्या रहमान डकैतच्या मयतीचा व्हिडिओ व्हायरल; एन्काउंटरनंतर अशी होती परिस्थिती, मृतदेहाजवळ...

Kothrud News : कोथरूडमध्ये एकाच वेळी पाणी व वीजपुरवठा खंडित; नागरिकांचा संताप!

Latest Marathi News Live Update : मुलांकडून इंटरनेट वापरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदे करावेत: उच्च न्यायालय

BMC Election: नवी मुंबईच्या राजकारणात मोठा ट्विस्ट! महापालिका निवडणुकीत १४ गावांचे पुनरागमन; २५ वर्षांनंतर इतिहास पुन्हा घडणार

SCROLL FOR NEXT