Great response to the Chetan's awareness program in Sangli 
पश्चिम महाराष्ट्र

दिव्यांग चेतनची प्रेरणादायी धडपड 

सकाळवृत्तसेवा

सांगली : चेतन उचितकर..दोन्ही डोळ्यांनी जन्मजात अंध. 137 पुरस्कारांचा मानकरी. गावोगाव गाणी गात या चौदा वर्षाचे मुलांने आपल्या चमूच्या मदतीने लाखो रुपयांचा निधी उभा केला आणि हा सारा पैसा त्यांनी पुन्हा समाजातील वंचित दिव्यांगाच्या मदतीसाठी दान करुन टाकला. त्याच्या या कार्याला सलाम सांगलीकरांनी शुक्रवारी सायंकाळी केला. निमित्त होते जागर जाणिवांचा...उमेद नव्या आयुष्याची या कार्यक्रमाचे.

जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्यावतीने सध्या महापूरग्रस्त गावांमध्ये मानसिक आरोग्य प्रबोधनाची मोहिम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून चेतनच्या चमूच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भावे नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास सांगलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. सुमारे अडीच तासाच्या या कार्यक्रमात चेतनसह वाशिम जिल्ह्यातून आलेल्या जन्मजात दिव्यांग अमोल गोडसे, कोमल खांडेकर, अश्‍विनी पवार, विजय खडसे, विकास गाडेकर, दशरथ जोगदंड, वडील पांडुरंग उचितकर यांनी विविध प्रेरणादायी गीते व संवादातून मानसिक आरोग्य प्रबोधन केले. त्यांचे उत्तम सादरीकरण पाहून सारे चकित झाले.

शुश्रूषा सल्ला मार्गदर्शन व प्रशिक्षण संस्थेचे कालिदास पाटील यांनी या कार्यक्रमात दिव्यांग मुलांचा जीवनप्रवास मांडला. या मुलांनी संकटावर केलेली मात लोकांसमोर मांडली. या मुलांचा जीवन प्रवास सर्वसामान्यतः येणाऱ्या दुःखांचे ओझे हलके झाले. 

चेतनने गेली सहा वर्षे असे कार्यक्रम करीत आहे. वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रतिबंधासाठी तो कार्यक्रम करीत आहे. त्यातून मिळालेला सारा पैसा त्यांनी त्या भागातील दिव्यांगासाठी, अनाथांसाठी खर्च केला आहे. ज्यांच्या घरात वीज नाही अशांच्या घरात सौर कंदील वाटले आहे. शंभरावर मुलांना शैक्षणिक मदतीसाठी दत्तक घेतले आहे. महापूराच्या काळात त्याच्या टीमने राख्या विकून मिळालेला निधी त्याने जिल्हाधिकारी कार्यालयाला महापूरग्रस्त निधीपोटी दिला. रोज हजारो किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या चेतनच्या टीमला स्वतःचे हक्काचे वाहन हवे आहे. त्यासाठी त्याला भरीव मदतीची गरज असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक संजय साळुंखे म्हणाले,"" निराशेच्या प्रसंगात चेतनची धडपड प्रेरणा देणारी अशीच आहे. जागर जाणिवांचा या कार्यक्रमाचा हेतूच मुळी लोकांचे मानसिक प्रबोधन आहे. यानिमित्ताने तो साध्य झाला आहे.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT