pregnant-2-gty-er-171120_16x9_992.jpg 
पश्चिम महाराष्ट्र

ग्रेट ः अशी केली  गर्भवती महिलेची मदत 

सकाळवृत्तसेवा

सांगली, : म्हैसाळ येथे राहणारी ही महिला गर्भवती आहे. तिला नवऱ्याने मारहाण केल्याने स्थानिक ग्रामस्थांनी तिला वसंतदादा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. उपचारानंतर ती पुन्हा गावी जाण्यासाठी रुग्णालयाबाहेर थांबली होती. मात्र एकतर शहरात लॉकडाऊन आणि रात्रीची वेळ असल्याने कुणी तिला मदत करण्यास तयार नव्हते.

महापालिकेचे कर्मचारी अमन आवळे यांनी या महिलेची विचारपूस केली. त्यानंतर आवळे यांनी नगरसेवक अभिजित भोसले यांना महिलेची अडचण सांगितली. श्री. भोसले तातडीने तेथे आले. त्यांनी महिलेस आधार देत सुखरुप घरी पोहोचवण्याची जबाबदारी घेतली. 
नगरसेवक भोसले यांनी महिलेच्या वडिलांशी संपर्क साधून त्यांना उगार येथे येण्यास सांगितले.

तसेच इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर आणि सामाजिक कार्यकर्त्या जयश्री पाटील यांना सोबत घेऊन अभिजित भोसले यांनी सदर महिला आणि तिच्या दोन मुलांना घरी सोडण्यासाठी एक ऍम्ब्युलन्स उपलब्ध केली. त्यातून ते स्वत:, मुस्तफा मुजावर महिलेस तिच्या माहेरी सोडण्यासाठी रवाना झाले. रात्री अकराच्या सुमारास महिलेस तिच्या वडिलांकडे सुखरुप पोहोचवूनच अभिजित भोसले, मुस्तफा मुजावर आणि जयश्री पाटील परतले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Citizenship: जन्मसिद्ध नागरिकत्वावर ट्रम्प यांचा डाव फसला! आदेशाला अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा ब्रेक; बर्थराइट सिटिझनशिप कायम

भाजपात अंतर्गत कुरघोडीचे राजकारण? नवनियुक्त शहराध्यक्षांच्या नियुक्तीला २४ तासांतच स्थगिती, नेमकं काय घडतंय?

Balen Shah News: नेपाळमध्ये नवा राजकीय वाद! बालेन शाहांच्या पक्षात ३५ हजार अल्पवयीन सदस्य? अडचणीत वाढ होणार

IND vs ENG 1st T20I: इंग्लंडने पहिला डाव टाकला; खचलेल्या टीम इंडियाला टक्कर देणारी प्लेइंग XI जाहीर; जोफ्रा नसला तरी...

Arabian Sea Monsoon : अरबी समुद्रात मॉन्सून तीव्र; ३ ते ६ जुलैदरम्यान मुंबई-उत्तर कोकणात अतिमुसळधार पाऊस, विदर्भातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT