Green decision made for vegetable growers 
पश्चिम महाराष्ट्र

भाजीपाला उत्पादकांसाठी झाला हिरवा निर्णय

आनंद गायकवाड

संगमनेर ः महसूल व कृषी विभागाच्या पुढाकारातून शेतमालासाठी चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. लॉकडाउनच्या काळात बाजारपेठ नसल्याने शेतमाल फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. या पार्श्वभूमीवर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा निवडक भाजीपाला सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनीमार्फत मोठ्या शहरांत पाठविण्यास काल प्रारंभ झाला. 

तालुक्‍यातील उत्पादित भाजीपाला, फळपिकांचे व्यवस्थित पॅकिंग करून पुणे, नाशिक, मुंबई अशा मोठ्या शहरांना पुरवठा करण्याचे काम सह्याद्री फार्मर प्रोड्युसर कंपनी करीत आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांना आधार देताना, त्यांच्या भाजीपाल्याला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न महसूल व कृषी विभागाने केला आहे. तालुक्‍यातील पिंप्री- लौकी- अजमपूर येथील आदर्श फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या साहाय्याने लिंबू, टोमॅटो व भाजीपाला पॅकिंग करून तो सह्याद्री कंपनीकडे पाठविण्यात आला. 

उत्पादकांचे पेमेंटही तातडीने करण्यात येणार आहे. त्यात समावेश होण्यासाठी कृषी सहायकांशी संपर्क साधून माहिती घ्यावी. एकमेकांशी समन्वय ठेवून मागणीप्रमाणे भाजीपाला पाठविण्यात येणार आहे, तसेच समस्यांचेही निवारण करण्यात येईल.

उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, मंडल कृषी अधिकारी, "आत्मा'चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक वैभव कानवडे व क्षेत्रीय कर्मचारी यासाठी प्रयत्नशील होते. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, नायब तहसीलदार सुधीर सातपुते आदींनी कृषिमाल निर्यातीच्या पहिल्या वाहनास हिरवा झेंडा दाखविला. 

लॉकडाउनमुळे शेतमाल ग्राहकांपर्यंत पोचविण्यात अडचणी येत होत्या. बाजार समितीतील लिलाव बंद असल्याने, भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्यावर भाजीपाल्याची निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. 
- सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DK Shivakumar : कर्नाटकातील १२ आमदारांची दोन लग्ने; खुद्द मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याकडे यादी, बंगळूरला स्थायिक झाल्याची माहीती

पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्वप्नील जोशीची खास पोस्ट; सुरू केलाय खास व्यवसाय; म्हणतो- जितकी मेहनत या ब्रॅण्डसाठी घेतेयस...

ना ढोल-ताशे, ना गर्दी... एकट्या भक्ताचा स्वतः घडवलेला बाप्पाला भावूक निरोप; डोळे पाणावणारा Video Viral

Madhya Pradesh: २१ वर्षांनंतर सरकारी बससेवेचे पुनरागमन; स्वतः तिकीट काढून मुख्यमंत्र्यांनी केला बस प्रवास video viral

Latest Marathi News Live Update : कोयना धरणातून ३,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT