Ground water level in Jat taluka at five years 
पश्चिम महाराष्ट्र

जत तालुक्‍यात भूजल पातळी पाच वर्षातील उच्चांकी 

राजू पुजारी

संख : जत तालुका कायम दुष्काळी आहे. दुष्काळा पाचवीला पूजलेला. पाच वर्षांपासून पाऊस कमी झाल्यामुळे पाण्याची पातळी 700 ते 800 फूटापर्यंत खाली गेली. रब्बी व खरीप हंगाम वाया गेला. द्राक्षे, डाळिंब बागा काढून टाकण्यात आल्या. 

पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली. जनावरांची संख्या कमी झाली. सन 2020 मध्ये जत तालुक्‍यात पाऊस दमदार झाला. भूजल पातळी 3.07 मीटरने वाढली आहे. सध्याची पाणी पातळी पाच वर्षातील उच्चांकी आहे. तलाव, बंधारे तुडुंब भरले आहेत. रब्बीतील पिके, द्राक्षे, डाळिंब व उन्हाळी पिकांना लाभ होणार आहे. पाणी टंचाई जाणवणार नाही. उन्हाळ्यात द्राक्ष बागांची खरड छाटणी वेळेवर होईळ. डाळिंब बागांचा बहर धरला जाणार आहे. शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. 

पाऊस कमी असल्याने जिराईत व कोरडवाहू जमिनीचे क्षेत्र अधिक आहे. सन 2009 नंतर ऑक्‍टोबर 2020 मध्ये महिन्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यावर्षी 778 मि. मी. इतका पाऊस झाला. मुचंडी, शेगाव, संख, जत, कुंभारी, तिकोंडी या मंडल विभागात अतिवृष्टी तर उमदी, माडग्याळ मंडळात कमी पाऊस झाला.संख मध्यम प्रकल्प व 25 तलाव, 12 कोल्हापूर बंधारे व सिमेंट बंधारे पूर्ण क्षमतेने तुडूंब भरले आहेत. 

बोर नदीवरील सर्व बंधारे भरले आहेत. गेल्या पाच वर्षातील पाणी पातळी वाढली आहे. उटगी दोड्डनाला मध्यम प्रकल्प, अंकलगी, दरीबडची साठवण तलाव 50 टक्केच भरलेत. काही भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. पूर्व भागातील अपवाद वगळता सोन्याळ, उटगी, जाडरबोबल, निगडी बुद्रुक परिसरात पाऊस कमी झाला. पाण्याची पातळी कमी आहे. जलसंधारणाची कामे ब-यापैकी झालीत. पाणी जमिनीत मुरल्याने भूमिगत पाण्याची पातळी वाढली. पुरेशी ओल झाल्याने 62 हजार 622 हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीतील पिकांची पेरणी झाली. डाळिंब हंगाम एप्रिल, मे महिन्यात धरला जाणार आहे. 

तीन वर्षातील पाणी पातळी : 
2018 2019 2020 
7.14मीटर 6.44 मीटर 3.07 मीटर 

मागील पाच वर्षातील सरासरी पाणी पातळी, मागील पाच वर्षातील वाढ, सरासरी पाणी पातळी 3.07 मीटर 5.90 मीटर 2.83 मीटर 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई! २८ कंटेनर अन् ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त, मुंबईत खळबळ

Palghar News: विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! जिल्हा परिषदेतील शिक्षकांची १८ टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Updates: सोलापुरातील होडगी रोडवर एका दुचाकीच्या शोरूम ला लागली आग

Baramati News : कारखेल येथे वीजेच्या धक्याने तरुणाचा मृत्यू, गावात शोककळा

Nagpur News: तीन एकर जागेवर उभारणार अत्याधुनिक श्वान निवारा केंद्र; प्राण्यांसाठी असणार सर्व सोयी सुविधा उपलब्ध

SCROLL FOR NEXT