Guardian Minister Jayant Patil visit BJP boycotts political marathi news 
पश्चिम महाराष्ट्र

पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दौऱ्यावर भाजपचा बहिष्कार

सकाळ वृत्तसेवा

सांगली : पालकमंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात आज भाजपच्या महापालिका आणि जिल्हा परिषदेतील सदस्यांनी बहिष्काराचे अस्त्र उगारले आहे. महापालिकेतील "करेक्‍ट' कार्यक्रमानंतर झालेल्या सत्ताबदलानंतर भाजप आक्रमक झाला असून त्याचे पडसाद आज सकाळी सरपंच परिषद व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात दिसून आले. दरम्यान जिल्हा परिषदेच्या या कार्यक्रमास भाजपचे खासदार संजय पाटील आणि भाजपच्या सत्तेत सहभागी असलेले शिवसेनेचे नेते अजितराव घोरपडे गटाचे सदस्य मात्र हजर होते.

पालकमंत्री पाटील यांचे आज महापालिका आणि जिल्हा परिषदेत कार्यक्रम आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेचा कार्यक्रम येथील डेक्कन हॉलमध्ये सुरु आहे. या कार्यक्रमात खासदार पाटील समर्थक सुरेंद्र वाळवेकर, अरुण बालटे, सरदार पाटील, प्रमोद शेंडगे तर घोरपडे समर्थक आरोग्य समितीच्या सभापती आशा पाटील उपस्थित होत्या. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे मात्र गैरहजर होते. भाजपचा हा बहिष्कारा पवित्रा कालच शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी जाहीर केला होता. त्यांनी दरम्यान दुपारी बारा ते अडीच दरम्यान महापालिकेत होणाऱ्या आढावा बैठकीवरही भाजप बहिष्कार टाकणार असल्याचे जाहीर केले आहे.

स्वागतासाठी  जंगी तयारी

मंत्री पाटील यांच्या स्वागतासाठी महापालिकेत जंगी तयारी केली आहे. रेड कार्पेट टाकून स्वागत करण्यात येणार आहे. पालकमंत्री झाल्यापासून आणि महापालिकेत महापौर-उपमहापौर निवड झाल्यानंतर कॉंग्रेस आघाडीची सत्ता आली आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Land Dispute: शेतकऱ्यांसाठी खुशखबर! जमिनीचे वाद सोडवणे झाले सोपे; महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत बदल

Maratha Reservation News: 'जरांगे तुझ्यात दमच नाही' बारस्करांनी दिलं चॅलेंज, नेमकं काय म्हणाले?

PBKS vs RCB: वेंकटेश अय्यरची तुफानी फटकेबाजी, विराट कोहलीचंही विक्रमी अर्धशतक; बंगळुरूने पंजाबसमोर ठेवलं भलं मोठं लक्ष्य

Bhumii Utsav 2026 : बारामतीत ‘भूमी उत्सव 2026’ उन्हाळी प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; 200 हून अधिक लघुउद्योजकांचा सहभाग

Pune Crime : उरुळी कांचनमध्ये पतीकडून पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड हल्ला; १५ दिवस घरात कैद

SCROLL FOR NEXT